अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा जगभरातील हिंदूंचा साजरा केलेला जाणारा पवित्र सण आहे. हा भारतातील सर्वात शुभ उत्सवांपैकी एक आहे. हे वैशाख महिन्यात शुक्ल पक्ष तृतीयेला येते. या वर्षीचा उत्सव मंगळवार, 3 मे रोजी होणार आहे. अक्षय्य तृतीयेला, ज्याला ‘अक्टी’ किंवा ‘अखा तीज’ म्हणूनही ओळखले जाते, लोक प्रार्थना (Prayer) करतात आणि योग आणि ध्यान यासारख्या आध्यात्मिक क्रियाकलापांमध्ये गुंततात. सौभाग्य आणि आनंद आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूचा अवतार भगवान परशुराम (Parshuram) यांचा जन्म झाला असे मानले जाते. यावर्षी अक्षय्य तृतीया पूजेचा मुहूर्त 3 मे रोजी पहाटे 5:18 वाजता असेल आणि 4 मे रोजी सकाळी 7:30 वाजता समाप्त होईल. तुमच्या प्रियजनांना सण साजरा करण्यात मदत करण्यासाठी अक्षय्य तृतीया 2022चे खास मेसेजेस, शुभेच्छा पाठवा.
1. अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना शुभेच्छा. तुमची भरभराट होवो आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा करो
2. ही अक्षय्य तृतीया तुम्हा सर्वांना आनंदाची जावो. देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो.
3. या शुभ दिवशी सोनं खरेदी करणं आणि परिधान केल्यानं सौभाग्य आणि संपत्ती मिळते, असं मानलं जातं. या दिनी तुमची भरभराट होवो. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!
4. ही अक्षय्य तृतीया हसतमुखाने तुमच्या आशा आणि स्वप्नांना उजळून टाको
5. अक्षय हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ “कधीही कमी होत नाही.” असा आहे. ही अक्षय्य तृतीया तुम्हाला नशीब आणि यश घेऊन येवो. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा.
6. ही अक्षय्य तृतीया तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मंगलमय जावो!
7. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, भगवान विष्णू तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देवो.
8. अक्षय्य तृतीयेच्या या शुभ दिनी परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो आणि अधिक समृद्धी, यश आणि आनंदाची नवीन सुरुवात करून देवो. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा.
9. ही अक्षय्य तृतीया तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या जवळ जाण्याची आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्याचं कारण बनण्याची संधी देईल. पुढील वर्षात देव तुम्हाला आशीर्वाद भरभराट देईल, या सदिच्छा
10. या अक्षय्य तृतीयेनं तुमचं जीवन आनंदानं, प्रेमानं भरावं. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!
11. अक्षय्य तृतीयेच्या या निमित्ताने देव तुम्हाला उत्तम आरोग्य आणि संपत्ती देवो.
12. अक्षय्य तृतीयेच्या या शुभ दिवशी तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!
13. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय्य तृतीया 2022च्या खूप खूप शुभेच्छा!
14. जगाने दिलेले सर्व सुख तुम्हाला प्राप्त होवो. अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा!
15. ही अक्षय्य तृतीया तुमचं जग आनंद, प्रेमाच्या उबदारतेनं प्रकाशित करो. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!