Amavasya: या तारखेला येणार वर्षाची शेवटची अमावस्या, अमावास्येच्या दिवशी ‘या’ गोष्टी टाळा

| Updated on: Nov 27, 2022 | 4:05 PM

पौष महिन्यात या वर्षाची शेवटची अमावस्या येत आहे. अमावास्येच्या दिवशी काही गोष्टी टाळण्याचा सल्ला शास्त्रात देण्यात आला आहे.

Amavasya: या तारखेला येणार वर्षाची शेवटची अमावस्या, अमावास्येच्या दिवशी या गोष्टी टाळा
अमावस्या
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, धार्मिक मान्यतेनुसार अमावस्या (Amavasya) तिथीला खूप महत्त्व आहे. कारण अमावस्येच्या दिवशी स्नान-दान आणि इतर अनेक धार्मिक कार्ये केली जातात. यासोबत पितृ तर्पणही या दिवशी केले जाते. 23 डिसेंबर, शुक्रवारी पौष (Poush) महिन्यातील अमावस्या येणार आहे. पौष महिन्यात सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.

अमावस्येचा कालावधी

पौष अमावस्या तारीख सुरू होते: 22 डिसेंबर 2022, संध्याकाळी 07:13 पासून

अमावस्या तारीख संपेल: 23 डिसेंबर 2022 दुपारी 03:46 पर्यंत

हे सुद्धा वाचा

पौष अमावस्या दिनांक: 23 डिसेंबर 2022, शुक्रवार

अमावस्येच्या दिवशी ‘या’ गोष्टी टाळा

अमावास्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात. भाद्रपदातील अमावास्या सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यांसाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये, असे सांगितले जाते. असे केल्यास नकारात्मकता येते. शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात. पूजा साहित्य हे शुभकार्यासाठी वापरले जाते. अमावास्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे आधी आणून ठेवावे. त्या दिवशी आणू नये.

अमावास्येदिनी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी मांस, मटण, मद्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये, असे सांगितले जाते. मंगलकार्यावेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज मानण्यात आले आहे. त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे. आरोगाच्या दृष्टीने ते चांगले नाही. तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते. यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही, असे सांगितले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)