Annapurna jayanti 2021| अन्नपूर्णा जयंती का साजरी केली जाते?, जाणून घ्या महत्त्व आणि कथा

| Updated on: Dec 15, 2021 | 11:08 AM

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते.

Annapurna jayanti 2021| अन्नपूर्णा जयंती का साजरी केली जाते?, जाणून घ्या महत्त्व आणि कथा
annapurna
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी माता पार्वती म्हणून साजरी केली जाते असे मानले जाते. असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झालातेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा या अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता. यावेळी अन्नपूर्णा जयंती 19 डिसेंबर रोजी रविवारी येत आहे. या दिवशी माँ अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही.

अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व
लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे. आपल्याला अन्नातून जीवन मिळते, म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याची नाश करू नये. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस, स्टोव्ह आणि अन्न यांची पूजा करावी. यासोबतच गरजूंना अन्नदान करावे.

पूजेची पद्धत
अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करावे. त्यानंतर स्वयंपाक घराची पूजा करावी.अन्नपूर्णामातेचे चित्र समोर ठेवून त्याची पुजा करावी. आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीची कथा वाचावी. पूजेनंतर एखाद्या गरीबाला अन्नदान करा.

काय आहे आख्यायिका ? 
पौराणिक मान्यतेनुसार, एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले. हताश होऊन लोकांनी ब्रह्मा, विष्णूची प्रार्थना केली. यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योगनिद्रातून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली. समस्येचे निराकरण करण्यासाठी, शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले. त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली. आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती साजरी करण्यात येते.

संबंधित बातम्या

Zodiac | ‘कठोर परिश्रम’ हीच या राशींच्या व्यक्तींची ओळख, तुमची रास यामध्ये आहे का ?

Chanakya Niti : पत्नी, बहीण- भावामध्ये सतत वाद होत आहेत, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी नक्की करा

Chanakya Niti | प्रत्येक जण फसवून जातोय? मित्र ओळखताना गफलत होतेय, मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी विचारात घ्या