Horoscope 5 May 2022:कोणतीही जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते, प्रिय व्यक्तिला भेटण्याची संधी मिळेल

| Updated on: May 05, 2022 | 6:10 AM

खास व्यक्तिची भेट आणि त्यांचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी खूप महत्वपूर्ण ठरेल.

Horoscope 5 May 2022:कोणतीही जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते, प्रिय व्यक्तिला भेटण्याची संधी मिळेल
योगा आणि ध्यानाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेच्या आधारे निश्चित केली जाते. ज्योतिषशास्त्रा (Astrology)त 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. या आधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्यद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घ्या.

तुळ

योगा आणि ध्यानाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. ज्यांने तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता जाणवेल. कोणतंही नवं काम करण्याआधी अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करणं लाभदायक ठरेल.
भावनेच्या भरात महत्वपूर्ण निर्णय कोणासोबत शेअर करू नका. नाहीतर कोणतीही जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते. काही वेळ मुलांसोबत नक्की घालवा, त्याच्या समस्या सोडवायला मदत करा.

खास व्यक्तिची भेट आणि त्यांचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी खूप महत्वपूर्ण ठरेल. नोकरी करणाऱ्यांनी बोलताना त्यांच्या कामाची माहिती इतरांन देऊ नये.

लव फोकस – कैटुंबिक वातावरण आनंदी राहिल.घरात पाहुण्याच्या येण्याने वातावरण आनंदी राहिल.

खबरदारी – त्वचेला एलर्जी होऊ शकते. पारंपारिक इलाजाला विशेष महत्व द्या.

शुभ रंग – नीळा
भाग्यवान अक्षर –
अनुकूल क्रमांक – 1

वृश्चिक –

उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील आणि आर्थिक स्थितीही सुधारेल. मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम अडकले असल्यास ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा यश नक्की मिळेल. धार्मिक आणि अध्यात्मिक संस्थांमध्ये तुमचे विशेष योगदान असेल.
कोणत्याही प्रकारचे गैर कृत्य तुम्हाला त्रास देऊ शकतं. नकारात्मक कामांपासून दूर राहणं चांगलं. जास्त व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक कामात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.
व्यवसायिक कामांचा गंभीरतेने विचार करा. जोखीम घेणं टाळलेलं बरं. नाहीतर संकटाला तोंड द्यावे लागेल. पण जनसंपर्कचा योग्य वापर केला तर योग्य फायदा होईल.

लव फोकस – तरुणांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होईल. कौटुंबिक जीवनात व्यावसायिक अडचणींवर वर्चस्व गाजवू देऊ नका.
खबरदारी – सर्दी, खोकला अशा तक्रारी राहतील. आयुर्वेदिक उपचार अधिक चांगले ठरतील
शुभ रंग – पिवळा
भाग्यवान अक्षर – स
अनुकूल क्रमांक – 9

धनु –

बऱ्याच दिवसांपासू असलेल्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. पुन्हा दैनंदिन कामात लक्ष देऊ शकाल. मोठ्याचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.
न आवडती बातमी मिळाल्याने तणाव आणि भिती अशी स्थिती निर्माण होईल. ध्यानात वेळ घालवा त्याने सकारात्मकता येईल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कोणत्याही अनैतिक कामात लक्ष देवू नका नाहीतर कोणत्यातरी संकटात फसू शकता.

लव फोकस – वैवाहिक जीवन आनंदी असेल. प्रिय व्यक्तिला भेटण्याची संधी मिळेल.
खबरदारी – इन्फेक्शन होण्याची शक्यता. महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्या.
शुभ रंग – हिरवा
भाग्यवान अक्षर –
अनुकूल क्रमांक – 5