मोठ्या नखांमध्ये अनेकदा घाण साचते, अशा स्थितीत त्यांना स्वच्छ करून कापणे आवश्यक असते, पण तुम्हाला माहिती आहे का? की, ज्योतिषशास्त्रानूसार नखे कापण्याची एक निश्चित वेळ असते. असे काही ठराविक वेळा आणि दिवस असतात ज्यात नखे कापू नयेत. ज्योतिष शास्त्रानुसार निषिद्ध दिवशी नखे कापण्याचे अनेक नकारात्मक परिणाम होतात. चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार (Astro Tips) कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी नखे कापणे टाळावेत.
ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी नखे कापणे निषिद्ध मानले जाते. संध्याकाळ ही माता लक्ष्मीची वेळ असते आणि तिचे आवाहन केले जाते, त्यामुळे संध्याकाळी नखे कापल्याने दारिद्र्य येते.
भगवान बृहस्पती म्हणजेच भगवान विष्णूची गुरुवारी पूजा केली जाते, असे मानले जाते की या दिवशी नखे कापू नयेत. त्याच वेळी, शनिवार आणि मंगळवारी नखे कापणे टाळावे, असे मानले जाते की या दिवशी नखे कापल्याने नकारात्मक ऊर्जा येते.
आपण शनिवार, मंगळवार आणि गुरुवार वगळता इतर कोणत्याही दिवशी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी नखे कापू शकता. तथापि, आंघोळ केल्यानंतर किंवा कपडे धुतल्यानंतर नखे कापल्यास ते सहजपणे कापले जातात. नखे कापण्यासाठी नेल कटर वापरा, काही लोक कात्री किंवा ब्लेडने नखे कापतात, हे करू नका.
बुधवारी नखे आणि केस कापणे शुभ मानले जाते. या दिवशी हे काम केल्याने घरामध्ये देवतांसह पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. धन मिळण्याचीही शक्यता असते. त्यामुळे बुधवार हा केस आणि नखे कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे.
शुक्रवारी आपण केस आणि नखे कापू शकतो. हा दिवस देवीचा असून याला सौंदर्याचा दिवसदेखील मानला जातो. या दिवशी केस आणि नखे कापल्याने व्यक्तीला समाधान प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले जाते.