Ganesh Visarjan 2024: गणेशोत्सवामुळे देशात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं असून दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींना भक्तांनी निरोप देखील दिला आहे. आता लवकरच सात आणि दहा दिवसांच्या गणरायाचं देखील विसर्जन होणार आहे. सांगायचं झालं तर, गणेशोत्सव हा 10 दिवसांचा असतो, पण त्या आधी देखील तुम्ही गणरायाचं विसर्जन करु शकता. जर तुम्हाला सातव्या दिवशी गणरायाचं विसर्जन करायचं असेल तर, त्यासाठी देखील शुभ मुहूर्त आहे. योग्य ग्रह-नक्षत्रा दरम्यान बाप्पाचं विसर्जन केल्यास ते शुभ आणि लाभदायक मानलं जातं.
गणेश चतुर्थीमध्ये 4 दिवसांचे विसर्जन असते. बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन दीड दिवस, 3 दिवस, 7 दिवस किंवा 10 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला होते. पण अनेक जण सातव्या दिवशी देखील गणरायचं विसर्जन करतात. जर तुम्ही देखील सातव्या दिवशी गणरायाचं विसर्जन करत असाल तर, शुभ मुहूर्त नक्की जाणून घ्या.
पंचांगानुसार शुभ मुहूर्त सकाळी 6.04 वाजता सुरू होईल आणि सकाळी 10.43 पर्यंत राहील. यानंतर दुसरा मुहूर्त 12:16 वाजता सुरू होईल आणि 01:49 पर्यंत राहणार आहे. संध्याकाळच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचे तर, तुम्ही बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन 04:54 ते 06:27 या वेळेत करू शकता.
गणरायासाठी भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भावना असते. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा असते. गणरायाच्या आगमनानंतर काही दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर निरोप देताना प्रचंड वाईट वाटतं. अशाच चार दिवसांचा गणपती अधिक शुभ मानला जातो. पण सर्वात जास्त महत्त्व अनंत चतुर्थीचं असतं. म्हणजे दहावा दिवस. दहाव्या दिवशी गणरायाची पूजा केली जाते आणि हा दिवस गणेश विसर्जन म्हणून ओळखला जातो.
यंदाच्या वर्षी 17 ऑगस्ट रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी 16 सप्टेंबर 204 रोजी दुपारी 3.10 पासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:44 वाजता संपेल. मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येणार आहे.