मुंबई : आयुष्यात प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या घरात नेहमी सुख, समृद्धी, संपन्नता असावी. आयुष्याशी संबंधित सर्व सुख-सोयी मिळवण्यासाठी निश्चितपणे देवी लक्ष्मी खूप महत्वाची आहे. या कलियुगात पैशांशिवाय काहीही मिळणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण हे पैसे कमवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करत असतो.
पैसा येताच जीवनाशी संबंधित सर्व दोष दूर होतात. ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, समाज त्याला आदराने पाहतो. तर, त्याच्या अनुपस्थितीत जीवन जगणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही देखील आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमची इच्छा असेल की तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असावा, तर खालील हे सात उपाय एकदा नक्की करुन पाहा –
? धन-संपत्तीच्या देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी कच्च्या दुधात हळद मिसळा आणि ते घराच्या सर्व कोपऱ्यात शिंपडा. हा उपाय केल्याने घर धन-धान्न्याने भरलेले असेल आणि कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही.
? जर देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घराच्या मंदिरात धूप अगरबत्ती लावावी. हा उपाय केल्याने घरात भरभराट होऊ लागते.
? जर तुम्हाला तुमचे घर धन-धान्न्याने परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्याने बनवलेले श्री यंत्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात विधीवत स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करा. हा उपाय केल्याने पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल.
? जर तुम्ही लाख प्रयत्न करुनही पैसे गोळा करु शकत नसाल तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गुंजाचे बियाणे एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा.
? गणपतीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी-गणेशाची मूर्ती किंवा चित्र पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा कॅश बॉक्सजवळ ठेवा. दररोज आपले काम सुरु करण्यापूर्वी, आपण लक्ष्मीजींची पूजा केली पाहिजे.
? जर तुमच्याकडे नेहमी पैशांचा साठा असावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये. या दिवशी दिलेले कर्ज लवकर परत येत नाही.
? कर्ज देण्याप्रमाणे कर्ज घेण्यासाठी दिवसाची खबरदारी घ्यावी आणि मंगळवारी कर्ज घेऊ नये. परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत.
Kanakdhara Stotra | जीवनात आर्थिक चणचण भासतेय, दर शुक्रवारी श्रीमहालक्ष्मीच्या या चमत्कारी स्तोत्राचे पठण कराhttps://t.co/UfWeDUp3bj#KanakdharaStotra #Financialcrisis #Money
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
PHOTO | कोल्हापूरच्या अंबाबाईच्या खास दागिन्यांची स्वच्छता, नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात