मुंबई : आज भौम प्रदोष व्रत आहे (Bhaum Pradosh Vrat 2021). या दिवशी भगवान शिव आणि हनुमानजींची पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला पाळला जातो. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत मंगळवारी येत असल्याने त्याला भौम प्रदोष व्रत म्हणतात (Bhaum Pradosh Vrat 2021 Do These Upay To Pleased Lord Shiva And Hanumanji).
प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि हनुमानजींची विशेष पूजा केल्याने आणि काही उपाय केल्याने ते प्रसन्न होतात आणि आयुष्यातील सर्व दु:खाचा नाश होतो. चला याबद्दल जाणून घेऊया.
? एखाद्याच्या कुंडलीत जर मंगळ दोष असेल तर भौम प्रदोष व्रताच्या दिवशी हनुमानजींना चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून अर्पण करा. या दिवशी सुंदरकांडचे पठण करणे खूप शुभ आहे. हा उपाय केल्याने सर्व अशुभ परिणाम टाळता येतात.
? कर्जाच्या बोजामुळे तुम्ही त्रस्त असाल तर भगवान शिव यांना मसूर अर्पण करा. हा उपाय केल्याने आपण लवकरच या समस्येपासून मुक्त होऊ शकता. याशिवाय, हनुमान मंदिरात त्रिकोणी ध्वज अर्पण करा.
? भौम प्रदोष व्रताच्या दिवशी हनुमानजींचा आशीर्वाद घेण्यासाठी गूळाचा लाडू अर्पण करा. यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात आणि तुमची सर्व इच्छा पूर्ण करतात.
? या दिवशी गरजू लोकांना अन्न द्या. असे केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतील.
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी गुळ आणि मध मिसळून भगवान शिवचा अभिषेक करावा. असे केल्याने धन-संपत्ती वाढण्याचे योगायोग निर्माण होतात आणि कुटुंबात आनंद आणि समृद्धी नांदते.
मान्यता आहे की, प्रदोष काळात भगवान शिव कैलास पर्वतावर प्रसन्न मुद्रेत नृत्य करतात. या दिवशी महादेवाची आराधना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे व्रत संतान प्राप्तीसाठी ठेवण्यात येते. भौम प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी संकटातून मुक्त होण्यासाठी मंगळ स्तोत्र पठण करा. असे केल्याने हनुमानजी तुमचे सर्व त्रास आणि नकारात्मक शक्ती दूर करतात. तसेच त्यांचे आशीर्वादही मिळतात.
Bhaum Pradosh Vrat 2021 | भौम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधीhttps://t.co/3jLeerCDuk#BhaumPradoshVrat2021 #PradoshVrat #LordShiva
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
Bhaum Pradosh Vrat 2021 Do These Upay To Pleased Lord Shiva And Hanumanji
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Nirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील