मुंबई : कल्याणकारी देव मानल्या जाणारे भगवान शिव प्रत्येक कणाकणात आहेत. देशात असे अनेक पवित्र शिवधाम आहेत, जे चमत्कारांनी भरलेले आहेत. यापैकीच एक म्हणजे हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे स्थित बिजली महादेव. सुमारे 2,460 मीटर उंचीवर असलेल्या या शिव मंदिराबद्दल अशी मान्यता आहे की दरवर्षी येथे शिवलिंगावर वीज कोसळते. चमत्कार फक्त इतकाच नाही तर हे शिवलिंग जोडले देखील जाते. या शिवलिंगाचे रहस्य काय आहे ते जाणून घेऊया (Bijli Mahadev At Himachal Pradesh Kullu Know The Story Of This Sacred Shiva Temple) –
हिमाचलमध्ये असलेल्या या शिवच्या पवित्र निवासस्थानाबद्दल लोकांची मान्यता आहे की अनेक हजार वर्षांपूर्वी कुलान्तक नावाचा एक राक्षस होता. एकदा अजगरासारख्या दिसणाऱ्या या राक्षसाने जेव्हा ब्यास नदीचा प्रवाह थांबवून दरी बुडवायचा प्रयत्न केला. जेव्हा भगवान महादेवाला हे कळले तेव्हा त्यांनी कुलान्तकचा आपल्या त्रिशूलने संहार केला. मान्यता आहे की मृत्यूनंतर, कुलान्तकच्या मृतदेहाने एका डोंगराचे स्वरुप घेतले. असे मानले जाते की कुलान्तकाच्या नावाचाच अपभ्रंश म्हणजे कुल्लू हे आहे.
त्या राक्षसाचा वध केल्यावर शिवने इंद्रदेवाला आदेश दिले की दर बारा वर्षांनी या राक्षसाच्या शरीरावर वीज पाडा. तेव्हापासून ही परंपरा चमत्कारिकपणे आजपर्यंत कायम आहे. आश्चर्य पण सत्य महादेव हा वज्रपात स्वतःवर घेतात आणि दर 12 वर्षांनी शिवलिंग वीज पडल्यामुळे तुटते, पण कोणालाही इजा होत नाही. ज्याप्रमाणे भगवान शिवने विष पिऊन प्राण्यांचे रक्षण केले म्हणून त्यांना नीलकंठ असे संबोधले गेले. त्याचप्रमाणे येथे ते स्वत:वर वीज झेलतात म्हणून त्यांना बिजली महादेव म्हटले जाते.
दर 12 वर्षानंतर शिवलिंग तुटण्याच्या घटनेनंतर मंदिराचे पुजारी लोणी लावून पुन्हा जोडून स्थापना करतात आणि पुन्हा एकदा महादेवाची पूजेला सुरुवात होते. श्रावण महिन्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.
Sawan 2021 : अतिशय कल्याणकारी आहे भगवान शंकराचा हा महान मंत्र, जप केल्यास दूर होतात सर्व दुःख https://t.co/GXBpHoUn3l #Sawan | #LordShiva | #shravanmaas
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2021
Bijli Mahadev At Himachal Pradesh Kullu Know The Story Of This Sacred Shiva Temple
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
आयुष्यातील कठीण प्रसंगात उपयुक्त ठरू शकतील गरुड पुराणातील या गोष्टी!