मुंबई : पंचतत्त्वावर आधारीत वास्तुशास्त्रामध्ये घराशी(Home) संबंधित प्रत्येक गोष्टीसाठी योग्य दिशा आणि आवश्यक नियम दिलेले आहेत. जर आपण या गोष्टींचे पालन केले तर आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढते. घराच्या भिंतीवर वापरलेला आरसा किंवा खिडक्यांमध्ये वापरल्या जाणार्या आरशाबद्दल देखील काही नियम देण्यात आले आहेत. घराच्या कोणत्या कोपऱ्यात आरसा लावल्यास शुभ फळ मिळतात आणि तो तुटल्यास दोष टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते नियम (Vastu Rules).
वास्तूनुसार घरामध्ये नेहमी चौकोनी आकाराचा काच वापरावा. गोल किंवा अंडाकृती मिरर कधीही वापरू नका. असे मानले जाते की गोल किंवा अंडाकृती मिररच्या प्रभावाने, सकारात्मक ऊर्जा देखील नकारात्मक मध्ये बदलते.
वास्तूनुसार तुमच्या बेडरूममध्ये आरसा लावणे टाळावे. जर तुम्हाला ते लावायचेच असेल तर अशा ठिकाणी ठेवा जेथे तुमचा पलंग त्यात दिसू शकत नाही. जर असे करणे कठीण असेल, तर ती काच वापरल्यानंतर, तो आरसा स्क्रीनने झाकून टाका.
वास्तूनुसार घरामध्ये कोणतीही काच तुटली असेल तर ती लगेच घराबाहेर फेकून द्यावी, ती कधीही घरात ठेवू नये. वास्तूमध्ये तुटलेली काच हा प्रमुख दोष ( आरसा वास्तु दोष ) मानला जातो .
तसेच घराच्या खिडक्यांपैकी कोणत्याही खिडकीला तडे गेल्यास लगेच काचा बदलून घ्याव्यात.
वास्तूनुसार घरामध्ये कधीही एक आरसा दुसऱ्या आरशासमोर ठेवू नये कारण यामुळे उद्भवणाऱ्या वास्तुदोषामुळे त्या ठिकाणी शांती आणि उर्जेचा संचार होण्याऐवजी अस्वस्थता वाढते. तसेच आरसा विसरूनही खिडकी किंवा दरवाज्यासमोर ठेवू नये कारण आरशातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा खिडकीतून किंवा दारातून बाहेर जाते.
असं मानलं जातं की घरात बसवलेली काच किंवा आरसा चुकून तुटला तर घरात येणारी आपत्ती टळण्याची चिन्हे दडलेली असतात.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Somavati Amavasya 2022 | सोमवती अमावस्येची आख्यायिका काय? जाणून घ्या पूजेची पद्धत
Debt Relief | आज चुकूनही कर्ज घेऊ नका, नाहीतर तुमच्यावर संक्रांत आलीच म्हणून समजा
Vastu Tips | तणाव दूर करणारा पारिजात, जाणून घ्या ओंजळीभर प्राजक्ताच्या फुलांची कमाल