दिवाळीच्या तोंडावर लक्ष्मी महागली, केरसुणीचे दर कडाडले

| Updated on: Oct 30, 2021 | 1:54 PM

भर दिवाळीच्या दिवसात केरसुणीचे दर यंदा 20ते 25 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. कोरोना काळात या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर संक्रात आली होती. आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला असला तरी कारागीर मात्र अडचणीत सापडले आहेत.

1 / 5
हिंदू धर्माप्रमाणे धनत्रयोदशीला नवीन झाडू विकत घेण्याची आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची परंपरा आहे.

2 / 5
या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. या लक्ष्मीने घरातील अलक्ष्मीला हाकलून देण्याची प्रथा आहे.

3 / 5
धनत्रयोदशीला झाडू विकत घेताना ते विषम संख्येत असावे म्हणजे एक, तीन किंवा पाच या संख्येत झाडू विकत घेणे अधिक शुभदायक असते.

4 / 5
पण भर दिवाळीच्या दिवसात केरसुणीचे दर यंदा 20ते 25 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. कोरोना काळात या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर संक्रात आली होती. आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला असला तरी कारागीर मात्र अडचणीत सापडले आहेत.

5 / 5
 केरसुणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल आणि इतर साहित्याच्या दरात वाढ झालीय. यातून केरसुण्याही महागल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या लक्ष्मीपूजनात महागलेल्या लक्ष्मीची पूजा करावी लागणार आहे.