मुंबई : चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri ) पवित्र सण 2 एप्रिलपासून सुरू झाला आहे. नवरात्रीनिमित्त मदिराम मातेच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. या शक्तीपीठाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुराणानुसार जगात 51 शक्तीपीठे आहेत. त्यापैकी 42 भारतात (India), 1 पाकिस्तानात, 4 बांगलादेशात, 2 नेपाळमध्ये, 1 तिबेटमध्ये आणि 1 श्रीलंकेत आहेत. पण आज आपण पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये असलेल्या हिंगलाज शक्तीपीठाबद्दल बोलणार आहोत. हिंगलाज शक्तीपीठाचा प्रवास अमरनाथपेक्षाही (Amarnath) कठीण असल्याचे सांगितले जाते. इथे हिंदू आणि मुस्लिम असा भेद नाही. चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घ्या या मंदिराबद्दल.
हिंगलाज मंदिराबद्दल असे म्हटले जाते की ते 2000 वर्षांहून अधिक जुने आहे. इथे हिंदू आणि मुस्लीम असा भेद अजिबात होत नाही. हिंदू आणि मुस्लिम एकत्र मातेची पूजा करतात. हिंदू या मंदिरात देवीच्या रूपात पूजा करतात, तर मुस्लिम नानी का हज किंवा ‘पीरगाह’ म्हणतात. अफगाणिस्तान, इजिप्त आणि इराण व्यतिरिक्त बांगलादेश, अमेरिका आणि ब्रिटनमधूनही लोक येथे दर्शनासाठी येतात.
हिंगलाज माता मंदिर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाज येथे हिंगोल नदीच्या काठावर आहे. या मंदिराचा प्रवास अमरनाथ पेक्षा जास्त कठीण असल्याचे म्हटले जाते. कारण पूर्वी जेव्हा येथे जाण्यासाठी योग्य साधन उपलब्ध नव्हते तेव्हा या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 45 दिवस लागायचे. आजही या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हे हिंगोल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर, मकरन वाळवंटातील खेरथर टेकड्यांच्या शेवटी बांधले गेले आहे.
या मंदिरामध्ये देवीची मूर्ती नाही. परंतु एका छोट्याशा नैसर्गिक गुहेत एक छोटा खडक आहे, ज्याची हिंगलाज माता म्हणून पूजा केली जाते. मंदिरात येण्यापूर्वी दोन संकल्प घ्यावे लागतात. हे दोन्ही संकल्प भक्तांच्या परीक्षेसाठी आहेत. जर ते पूर्ण झाले नाहीत तर तुमचा प्रवास आणि भक्ती पूर्ण मानली जात नाही. भारतामधूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी जातात.
संबंधित बातम्या :
Chaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीमध्ये चुकूनही या गोष्टी करू नका…
03 April 2022 Panchang | 03 एप्रिल 2022, रविवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ