मुंबई : भारतातील विद्वानांपैकी आचार्य चाणक्य हे महत्त्वाचे विद्वान. चंद्रगुप्त मौर्य यांना महान राजा बनवण्यात त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात मानवी जीवनातील प्रत्येक पैलूचा सविस्तर उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांनी स्त्रीने कसे असावे याबद्दल माहिती दिली आहे.आचार्य यांच्या मते, ज्या स्त्रीमध्ये 5 विशेष प्रकारचे गुण असतात ती कोणत्याही व्यक्तीला सहजपणे भाग्यवान बनवू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते गुण.
अध्यात्म मानवी जीवनाचा महत्त्वाच पैलू आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात धार्मिक स्वभावाची स्त्री असेल तर त्या व्यक्तीचे नशीब बदलण्यास मदत होते. धार्मिक स्त्रिया दररोज पूजा करतात. ज्या घरांमध्ये रोज पूजा होते अशा घरात देवाचा वास असतो. अशी मान्याता आहे.
जी स्त्री आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवते आणि समाधानी असते, ती तिच्या जोडीदाराला प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देते. अशा महिला मोठ्या संकटातही आपल्या जोडीदाराची साथ कधीच सोडत नाहीत.
ज्या स्त्रिया आपल्या जीवनात प्रत्येक प्रकारे संयम ठेवतात, त्यांच्या घरात कधीही अपयश येत नाही. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात संयम आहे अशा स्त्रीला नेहमी यश मिळते.
राग हा प्रत्येक माणसाचा शत्रू मानला जातो. ज्या स्त्रीयांचा आपल्या रागावर नियंत्रण असते अशा स्त्रीया उत्तमप्रकारे आपलं घर चालवतात. ज्या घरात शांती असते तिथे देवही वास करतो. अशा घरांमध्ये मोठे अडथळे कधीच येत नाहीत.
गोड वाणी असणारी स्त्री एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असेल तर तिचे नशीब नेहमीच तिला प्रत्येक परिस्थितीत साथ देते. या महिला आपल्या बोलण्याने घरातील वातावरण नेहमी प्रसन्न ठेवतात.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
आता ग्राहकच राजा, उत्पादनातील दोषाची बिनधास्त करा तक्रार , खटल्यांचा निकाल ही लागणार झटपट
Public Provident Fund: गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न
असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं