कोणतेही ध्येय निश्चित करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा, मी हे काम का करत आहे? याचा परिणाम काय होईल? यात तुम्ही यशस्वी व्हाल का? तिन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पटणारी असतील तरच त्या ध्येयाकडे वाटचाल करा.
यशाचे पुढचे तत्व म्हणजे तुम्हाला जे हवे आहे त्याबद्दल मनापासून आणि प्रामाणिकपणे तयारी करा, परंतु त्याचा उल्लेख कोणाशीही करू नका. गुप्तपणे काम करत राहा.
यश मिळविण्यासाठी कधीही नशिबावर अवलंबून राहू नका. तुम्ही तुमचे भाग्य स्वतः लिहू शकता. त्यामुळे तुमची क्षमता ओळखा आणि पूर्ण झोकून देऊन मेहनत करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. नशिब त्यांचे पण असते ज्यांना हात नसतात त्यामुळे तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा.
यशाच्या मार्गात अनेक वेळा अपयशाला सामोरे जावे लागते. अशा वेळी अपयशाला यशाच्या प्रवासातील धडा समजून पुढे जा. तुमची सकारात्मक वृत्ती आणि कठोर परिश्रम यांची सांगड तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल.
ज्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचे आहे त्या क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध ठेवा. असे केल्याने तुम्हाला ओळखही मिळेल आणि भविष्यात त्याचा फायदाही मिळेल. ‘मी’ पणा सोडा जर तुम्हाला आयुष्यात पैशाच्या कमतरतेचा सामना करायचा नसेल तर तुमच्यात अहंकार कधीही येऊ देऊ नका. अहंकारी माणसाला योग्य आणि अयोग्य यातला फरक दिसत नाही. अशा स्थितीत तो स्वत:चाच नाश करतो.