मुंबई : आचार्य चाणक्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली. या संकटांवर त्यांनी मत केली. याकाळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी चाणक्यनीतीमध्ये लिहीले आहेत. आचार्यांचे नीतिशास्त्र नावाचे कार्य आजही खूप लोकप्रिय आहे. चाणक्यनीतीत त्यांनी धर्म, समाज, राजकारण, पैसा, नातेसंबंध याबद्दल बरेच काही सांगितले आहे. नीतीशास्त्रात लिहिलेल्या गोष्टी आजच्या काळातही समर्पक आहेत. आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात. अशा परिस्थितीमध्ये कुठलाही मार्ग सापडत नसेल तर चाणक्यांचे 4 विचार तुमचं मार्गदर्शन करतील. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने पैशाच्या बाबतीत खूप जागरूक असले पाहिजे आणि पैसा खूप विचारपूर्वक खर्च केला पाहिजे. पैसा नेहमी विचारपूर्वक आणि चांगल्या कामात गुंतवावा. चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करणे टाळा.
आचार्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने पैसे वाचवायला शिकले पाहिजे. तुमची बचत हा तुमचा खरा मित्र आहे. तुमच्या वाईट काळात बचत उपयोगी पडते. बचत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे केवळ आवश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे. कोणतीही गोष्ट विकत घेण्याआधी ती गरजेची आहे का ? हा विचार करा.
चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने आपल्या कमाईपेक्षा जास्त पैसा खर्च करू नये. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च केलेत तर त्याचा फटका सहन करावा लागेल. तुम्हाला भविष्यातील त्रास टाळायचा असेल तर पैशाचा अपव्यय थांबवा.
पैशाचा वापर कधीही कोणाचे नुकसान करण्यासाठी करू नका. असे करणाऱ्यांना भविष्यात निश्चितच अडचणींचा सामना करावा लागेल.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे. TV9 याची पुष्ठी करत नाही.
संबंधित बातम्या :
Remedy for evil eye | कोणतंच काम होत नाहीय?, कामात अडथळे येतात ? मग हे उपाय करून पाहा
Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा
Char Dham | अद्भुत! उत्तराखंडमधील चार धामासंबंधित काही रंजक गोष्टी