Chanakya Niti | या 3 परिस्थितीत पळून जाणे भ्याडपणा नाही, तर शहाणपणाचं लक्षण असतं
आचार्य चाणक्य हे विद्वान तसेच पात्र शिक्षक होते. जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तेथे अनेक वर्षे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले, या काळात त्यांनी अनेक रचना केल्या.
1 / 5
आचार्य चाणक्य हे विद्वान तसेच पात्र शिक्षक होते. जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तेथे अनेक वर्षे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले, या काळात त्यांनी अनेक रचना केल्या. आचार्यांचे नीतिशास्त्र आजही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्यामुळे नीती शास्त्राला चाणक्य नीती असे म्हणतात.
2 / 5
आचार्य चाणक्य यांनी ज्या ठिकाणी दुष्ट लोक राहतात तिथून निघून गेलेच चांगलं. ही तुमची सूबुद्धी आहे. दुष्ट लोक कधीही विश्वासार्ह नसतात, ते तुमचे कधीही नुकसान करू शकतात. त्यामुळे असे ठिकाण सोडण्यातच शहाणपणा आहे.
3 / 5
जर अचानक शत्रूने तुमच्यावर हल्ला केला किंवा तुम्ही शत्रूवर विजय मिळवू शकत नसाल तर अशा परिस्थितीत तेथून पळ काढणे शहाणपणाचे आहे. शत्रूला योग्य रणनीतीने तोंड दिले पाहिजे. म्हणजेच आताच्या परिस्थितीत समजवायचे झालं तर तुमची तयार नसताना तुमच्याशी कोणी वाद घालत असेल तर तेथून निघून जाणेच चांगले असते.
4 / 5
आचार्य चाणक्य म्हणतात की, दुष्काळ पडलेल्या ठिकाणी थांबणे मूर्खपणाचे आहे, विनाकारण जीव धोक्यात घालू नका आणि अशी जागा लगेच सोडा. जर तुम्हाला कळत असेल की इथे राहून तुमचे नुकसान होणार आहे तर तेथे राहू नका.
5 / 5
संकटसमयी तेथून घाबरून पळून जाणे हे भ्याडपणाचे लक्षण मानले जाते, पण काही विशिष्ट परिस्थितीत पळून जाणे म्हणजे भ्याडपणा दाखवत नाही, तर समजूतदारपणा म्हणतात. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतीमध्ये अशा काही परिस्थितींचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये पळून जाणे हा शहाणपणाचा निर्णय आहे.