मुंबई : आयुष्यात माणसाने जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारून समाधानी राहावे. पण आचार्य चाणक्यांच्या (Chanakya)मते आयुष्यात काही गोष्टींच्या बाबतीत असंतोष (Unsatisfaction) राहणच महत्त्व असतं. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती (Chanakya Niti) या पुस्तकात काही विशेष परिस्थितींचा उल्लेख केला आहे. काही ठिकाणी असंतोष माणसासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळेच माणूस आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. आचार्य चाणक्य यांनी कोणत्या परिस्थितीत समाधानी राहून आणि कोणत्या परिस्थितीत असमाधानी राहावे याबद्दल सांगितले आहे.
संतोषस्त्रिषु कर्तव्यः स्वदरे भोजने धणे त्रिषु चैवा न कर्तव्येसो अधेने जपद्यो
या श्लोकाद्वारे आचार्यांनी तीन स्थितीत समाधान आणि तीन स्थितीत असंतोष ठेवण्याचे सांगितले आहे.
या परिस्थितीत समाधानी राहा
1. आचार्य चाणक्य यांच्यानुसार पत्नी सुंदर नसली तरी व्यक्तीने समाधानी राहावे आणि इतर कोणत्याही स्त्रीकडे आकर्षित होऊ नये. अन्यथा ती व्यक्ती स्वतःसाठी संकटांना आमंत्रण देते.
2. जे काही अन्न उपलब्ध असेल त्यात तृप्त व्हाव. कधीही खाण्याचे वाईट करू नका किंवा ताटात अन्न सोडू नका.
3. व्यक्तीने त्याच्या उत्पन्नात समाधानी राहून आनंदी असले पाहिजे. उत्पन्नानुसार आपला घरखर्च ठेवला पाहिजे आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
या परिस्थितीत असमाधानी असणे आवश्यक आहे
1. व्यक्तीने शिक्षण आणि ज्ञानाच्या बाबतीत असमाधानी राहिले पाहिजे. तुम्ही जितके जास्त असमाधानी असाल, तितके अधिक सक्षम आणि पात्र बनता.
2. दानाच्या बाबतीत व्यक्तीने असमाधानी राहिले पाहिजे. दान केल्याने पुण्य मिळते आणि आपले जीवन सुधारते.
3. तुम्ही देवाच्या मंत्राचा जितका जास्त जप कराल तितके तुमचे कल्याण होईल. त्यामुळे मंत्राचा जप करून कधीही तृप्त होऊ नका.
संबंधीत बातम्या :
Tilkut Chauth 2022: तिळकुट चौथला चुकूनही हे काम केल्यास महागात पडणार , जाणून घ्या याबद्दल सविस्तर!