Chanakya Niti : महिलांनी या सहा गोष्टी कोणासोबत शेअर करु नये…चाणक्य नीतीनुसार सीक्रेट काय ठेवावे?

| Updated on: Jul 26, 2024 | 12:11 PM

हजारो वर्षांपूर्वी, आचार्य चाणक्यांनी चाणक्य-नीती शास्त्र लिहिले आहे. त्यांनी मानवाच्या आयुष्यासंदर्भात अनेक महत्वाचे सल्ले देणारे लिखाण केले आहे. अर्थशास्त्रात अनेक फायद्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे त्यांचे लेखण चाणक्य नीती नावाने परिचित झाले आहे.

Chanakya Niti : महिलांनी या सहा गोष्टी कोणासोबत शेअर करु नये...चाणक्य नीतीनुसार सीक्रेट काय ठेवावे?
आर्य चाणक्यांनी काही नैतिक शिकवणी दिल्या आहेत
Image Credit source: social media
Follow us on

आचार्य चाणक्य प्रसिद्ध अर्थशास्त्र आणि कुटनीतीतज्ज्ञ आहे. आचार्य चाणक्य हे त्यांच्या गुणांनी राजकीय विद्वान, नीतिशास्त्राचे मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. हजारो वर्षांपूर्वी, आचार्य चाणक्यांनी चाणक्य-नीती शास्त्र लिहिले आहे. त्यांनी मानवाच्या आयुष्यासंदर्भात अनेक महत्वाचे सल्ले देणारे लिखाण केले आहे. अर्थशास्त्रात अनेक फायद्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे त्यांचे लेखण चाणक्य नीती नावाने परिचित झाले आहे. चाणक्य नीती जगभरात प्रासंगिक आहे. आयुष्यातील अनेक समस्या सोडवण्याचे सूत्र चाणक्यांनी दिले आहे. चाणक्य नीतिमध्ये महिलांसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. नीती, अनिती, मैत्री, शत्रूता, कुटुंब, जीवनसाथी, देश, व्यवहार, कारभार आदी सर्व मुद्द्यांवर चाणक्य यांनी चर्चा केलेली आहे

कोणत्या सहा गोष्टींची माहिती महिलांनी देऊ नये

  1. महिलांना आपला पगार, उत्पन्न आपल्यावर असलेले कर्ज याची माहिती कोणालाही देऊ नये. आपल्या पतीजवळही ही माहिती शेअर करु नये.
  2. महिलांना असलेली व्यक्तीगत अडचण आणि परिवारातील समस्या यासंदर्भात कोणाकडे बोलू नये. या गोष्टी बाहेरील व्यक्तीबरोबर शेअर करु नये.
  3. महिलांनी आपल्या प्रेम प्रकरणाबाबत कोणाशी चर्चा करु नये. महिलांचा सन्मान आणि आदर कायम ठेवण्यासाठी हे राज न उघडलेलेच योग्य ठरणार आहे.
  4. महिलांनी आपला करिअर गोल आणि भविष्यातील योजनासंदर्भात कोणाशी चर्चा करु नये. ही माहिती त्यांनी जवळच्या मित्रांसोबत शेअर करु नये.
  5. महिलांनी दिलेल्या दानाची माहिती कोणाला देऊ नये. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये, या पद्धतीने दान कार्याची माहिती गोपणीयच ठेवावी.
  6. महिलांनी आपल्या वैद्यकीय परिस्थितीची माहिती सर्वांना देऊ नये. ही माहिती ज्यांना सांगणे आवश्यक आहे, त्यांनाच सांगवी. जसे डॉक्टर…

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा