यंदाच्या वर्षीचे दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. आता अवघे काही तास चंद्रग्रहणाला शिल्लक आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षीचे हे शेवटचे चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी 4 तास 4 मिनिटे असेल. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 12 मिनिटाला सुरू होईल आणि सकाळी 10 वाजून 17 मिनिटाला समाप्त होईल. हे ग्रहण सुमारे चार तास चालणार आहे. या चंद्रग्रहणाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. काही भागांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण मीन राशीत होणार आहे.
यंदाच्या वर्षीचे दुसरे मोठे ग्रहण
हे चंद्रग्रहण यंदाच्या वर्षीचे दुसरे मोठे ग्रहण आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते, ज्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. या चंद्रग्रहणाचा परिणाम तसा भारतामध्ये होणार नाहीये. उत्तर दक्षिण अमेरिका, हिंद महासागर, अफ्रिका, यूरोप, अटलांटिक महासागर आणि या भागात दिसेल.
यामुळेच चंद्रग्रहणाला दिले जाते मोठे महत्व
ज्योतिष शास्त्रामध्ये देखील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनांना खूप महत्त्व दिले जाते. पंचांग नुसार 2024 मध्ये एकूण 4 ग्रहण होतील. ज्यामध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहणांचा समावेश आहे. हे चंद्रग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण असेल. पेनम्ब्रल चंद्रग्रहणात साधारणपणे चंद्र किंचित अस्पष्ट दिसतो.
कधी सुरू होणार चंद्रग्रहण आणि कधी संपणार
मुळात म्हणजे हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये, यामुळेच सूतककाळही पाळण्याची अजिबात गरज नाहीये. उद्या हे ग्रहण सकाळी 6:12 वाजता सुरू होईल आणि 10:17 वाजता संपेल.चंद्रग्रहण जेव्हा चंद्र पृथ्वीच्या मध्यभागातून जातो तेव्हा होतो, ज्यामुळे चंद्र किंचित काळा होतो.