प्रदोष व्रत हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे जे महादेवाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रियोदशी तिथीला हे व्रत केल्या जाते. प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी महादेवाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्ती होते. शनिदोष असलेल्या लोकांसाठी प्रदोष व्रत अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे व्रत केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. महादेवांच्या कृपेने हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या व्रतामुळे दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य प्राप्त होते.
प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पूजा केल्याने आणि विशेष मंत्र्यांचा जप केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते. हे मंत्र केवळ शब्द नाही तर शक्तिशाली ऊर्जेचे वाहक आहेत. या मंत्रांचा जप केल्याने मन शांत होते तणाव कमी होतो आणि व्यक्ती आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण होतो.
पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी पहाटे 02:26 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 29 डिसेंबर रोजी पहाटे 03:32 वाजता समाप्त होईल. हे वर्षातील शेवटचे प्रदोष व्रत असणार आहे. हा दिवस शनिवार असल्याने हा प्रदोष शनी प्रदोष म्हणून ओळखला जाईल.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||
हा मंत्र अतिशय शक्तिशाली मानला जातो आणि त्याला मृत्युंजय मंत्र देखील म्हणतात. या मंत्राचा जप केल्याने दीर्घायुष्य, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते.
मंत्र: ॐ नमः शिवाय
हा मंत्र महादेवांचा पंचाक्षरी मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने मनःशांती मिळते आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
मंत्र: ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्
हा मंत्र महादेवांना समर्पित गायत्री मंत्र आहे. याचा जप केल्याने बुद्धी आणि ज्ञान वाढते.
मनशांती: या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि तणाव दूर होतो.
रोगांपासून मुक्ती: हे मंत्र अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती देतात.
सुख आणि समृद्धी: या मंत्रांचा जप केल्याने जीवनात सुख समृद्धी येते.
इच्छापूर्ती: हे मंत्र इच्छा पूर्ण करण्यात मदत करतात.
शनिदोषासाठी प्रभावी: शनि दोषाने पीडित लोकांसाठी हे मंत्र अत्यंत फायदेशीर आहेत.
प्रदोष काळात महादेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रदोष काळ हा सूर्यास्तापासून रात्री दहा वाजेपर्यंत असतो. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाला पाणी अर्पण करून, बेलपत्र अर्पण करावे तसेच उदबत्ती लावा. या दिवशी महादेवाच्या मंदिरात जावून पूजा करा. तसेच शक्य असल्यास गरिबांना भोजन आणि काही दान करा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)