मुंबई : देवी लक्ष्मीसौबत भगवान विष्णूच्या पूजेसाठी शुभ मानल्या जाणार्या चातुर्मास देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) 20 जुलै 2021 ते देवोत्थान एकादशी (कार्तिकी एकादशी) 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत असेल. मान्यता आहे की या चातुर्मासमध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रेसाठी पाताळात जातात. या वेळी भगवान विष्णूचे साधक संयम आणि नियमांनी जप, तपश्चर्या, दान इत्यादी करुन भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपाय करतात. हिंदू धर्माबरोबरच जैन आणि बौद्ध धर्मातही चातुर्मासाचं विशेष महत्त्व आहे. चातुर्मास संबंधित कथा, महत्त्व आणि त्यासंबंधी नियमांबद्दल जाणून घेऊ (Chaturmas 2021 Know The Story And Importance Of Chaturmas ) –
मान्यता आहे की, एकदा राक्षसांचा राजा विरोचनाचा मुलाचा मुलगा बलिने अश्वमेध यज्ञ करुन बरेच पुण्य अर्जित केले. यामुळे सर्व राक्षस देवतांपेक्षा उच्च श्रेणीत पोहोचले आणि त्यांनी देवतांचा राजा इंद्र याच्याकडून त्याचे सिंहासन काढून घेतले. यानंतर सर्व देवता मदत मागण्यासाठी भगवान विष्णूच्या आश्रयाला गेले. मग भगवान विष्णूने देवतांच्या रक्षणासाठी वामन अवतार घेतला आणि बलिच्या डोक्यावर पाय ठेवून तीन पावलांमध्ये पृथ्वी, आकाश आणि पाताळ मोजून बलिला आश्रयहीन केले. पण, त्या बदल्यात बलिला पाताळाचे राज्य दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा बलिने त्याला विनंती केली की वर्षातून एकदा त्यांनी माता लक्ष्मीसोबत पाताळलोकात निवास करावा. भगवान विष्णूने तथास्तु म्हणून त्यांची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून भगवान विष्णू हे चार महिने पाताळलोकात योग निद्रेत देवी लक्ष्मीबरोबर राहतात.
चातुर्मास अर्थात चार महिन्यांचा हा काळ विशेषत: देवाच्या साधनेसाठी अध्यात्मिक मानला जातो. या चार महिन्यात भगवान श्री विष्णूची उपासना करण्याची परंपरा आहे. मान्यता आहे की, भगवान विष्णू सर्वव्यापी आहेत आणि ते संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ता आहेत. म्हणूनच, या पवित्र महिन्यात देवी लक्ष्मीसोबत शेषनागवर झोपलेल्या विष्णूच्या मूर्तीची पूजा केली जाते. या चार महिन्यांत जो कोणी सर्व नियम पाळत भगवान विष्णूची उपासना करतो त्याला सुख आणि समृद्धी इत्यादींचा लाभ मिळतो आणि अखेर त्याला मोक्ष प्राप्त होतो.
आयुर्वेदानुसार चातुर्मासमध्ये साधे, ताजे आणि पचण्याजोगे अन्न घ्यावे.
मांसाहारी, पालेभाज्या आणि दहीचे सेवन चातुर्मासमध्ये टाळावे.
एखाद्याने चातुर्मासात ब्रह्मचर्य पूर्णपणे पाळले पाहिजे.
चातुर्मास दरम्यान दिवसा झोपू नये.
शरीर, मन आणि आरोग्यासाठी सर्व नियमांचे पालन करुन ध्यान, जप करावा आणि चवेचा त्याग केला पाहिजे.
Lord Vishnu Birth | भगवान विष्णूंचा जन्म कसा झाला, गुरुवारी नारायणाची पूजा कशी करावी जाणून घ्याhttps://t.co/Ar27O2KxhK#LordVishnu #Narayana #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 15, 2021
Chaturmas 2021 Know The Story And Importance Of Chaturmas
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chaturmas 2021 | श्री हरिचा आशीर्वाद हवा असेल तर चातुर्मासात चुकूनही ‘ही’ कामे करु नये
गुरुवारच्या दिवशी ही 4 कामं नक्की करा, यशाच्या मार्गात येणारे अडथळे होतील दूर