मुंबई : राज्यातील (state) निर्बंध कमी होत आहे. राज्यातील देवांवर मात्र शुक्लकाष्ट लागले आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या गायमुख देवस्थान येथे दरवर्षी माघ (Magh) महिन्याच्या माधकृष्ण चतुर्थदशीला मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री ची यात्रा भरते. या यात्रेला महाशिवरात्री च्या पाच दिवसापूर्वी पासून च मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातीलच नव्हे तर बाजूच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड व पुर्व विदर्भातील इतर जिल्ह्यातील भाविक भक्त सुद्धा मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदा कोरोना चा तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेता. भंडारा जिल्हा प्रशासनाने यात्रेला स्थगिती दिली आले.सातपुडा पर्वत रांगातील लहान महादेव म्हणून प्रसिद्ध गायमुख यात्रेला यंदा कोरोनाचे ग्रहण लागले आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधन
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात नसले तरी दररोज किमान एक-दोन नवीन रुग्ण आढळत आहेत.त्यामुळे ही वाढणारी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारे कार्यक्रम नियंत्रित करून किंवा रद्द करण्याचे जिल्हाधिकारी आदेश काढले आहेत.यंदा महाशिवरात्री ची यात्रा भरणार मंदिर उघडणार अशी अशा भाविकांमध्येसुद्धी होती . मात्र कोरोना चा तिसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव लक्षात घेता यंदा ही यात्रा जिल्हा प्रशासनाने यांनी रद्द केली असले तरी.एकदंरीत पुर्वी सारखेच पाच दिवसा अगोदर पासूनच मोठ्या प्रमाणात गायमुख यात्रेसाठी भाविक भक्त गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे मंदिर जरी बंद असले तरी यंदा भाविक भक्त मंदीराच्या गेट जवळच पुजा अर्चना करीत गर्दी करीत आहेत.
गायमुख
गायमुख हे 1 9 71 मधील भंडारा तालुक्यात 217 रहिवासी असून ते भंडारा तहसीलपासून 20 मैल अंतरावर आहे आणि अंबगदपासून सहा मैल अंतरावर आहे. यालाच म्हणतात कारण येथे खडकातून वसंत ऋतु येते, आणि गायीमुख किंवा गायीचे तोंड असे झरेपर्यंत वापरले जाते कारण गायचे तोंड कधी कधी खडकांमधून कोरलेले असते. तिथे एक गुहा मंदिर आहे ज्याचा उल्लेख कुरमवारांनी केला आहे.
संदर्भ : महाराष्ट्र शासन संकेतस्थळ
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Chanakya Niti : सावधान! , आयुष्यात या 5 गोष्टी झाल्यास देवी लक्ष्मी रागवलीच म्हणून समजा
28 February 2022 Panchang : 28 फेब्रुवारी 2022, सोमवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ