जीवनात आनंद कुणाला हवा नसतो? कुटुंबात सुख-शांती अबाधित राहावी यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात, परंतु हे सर्व असूनही अनेक वेळा घरात नकारात्मक उर्जेचा प्रभाव असतो. परिणामी प्रयत्नांना नशिबाची जोड मिळत नाही आणि कधी कधी आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी फेंगशुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या समस्या दूर होऊ शकतात. घरात विशिष्ट वस्तू ठेवल्याने त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. त्याचबरोबर सुख-समृद्धीही नांदते. फेंगशुईमध्ये अशा अनेक गोष्टींचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे, ज्यांना घर, कार्यालय किंवा आंगण इत्यादीमध्ये ठेवल्याने व्यक्तीच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यातील एक स्फटिक वृक्ष जे क्रिस्टल ट्री (Crystal Tree Benefits) म्हणून ओळखल्या जाते. घरामध्ये स्फटिकाचे झाड ठेवल्याने सुख-समृद्धी येते अशी मान्यता आहे.
कसे असते क्रिस्टल ट्री?
क्रिस्टल ट्री (Crystal Tree) म्हणजेच स्फटिक वृक्ष विविध रंगीबेरंगी खडे आणि स्फटिकांचे बनलेले असते. असे म्हटले जाते की जर फेंगशुईमध्ये सांगितलेल्या नियमांनुसार क्रिस्टलचे झाड घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवले तर व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.
घर किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल ट्री लावल्याने होतात ‘हे’ फायदे
शिक्षणात यश मिळवण्यासाठी इच्छुक व्यक्तीने त्याच्या अभ्यासाच्या ठिकाणी क्रिस्टल ट्री ठेवल्यास लाभ मिळतो. फेंगशुईनुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्टडी रूम किंवा स्टडी टेबलच्या ईशान्य कोपर्यात क्रिस्टल ट्री ठेवावे. असे केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. फेंगशुईनुसार लिव्हिंग रूम किंवा बेडरूमच्या नैऋत्य दिशेला क्रिस्टल ट्री लावणे शुभ मानले जाते. यामुळे वैवाहिक जीवनात आनंदासोबतच गोडवा राहतो. फेंगशुईनुसार घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला क्रिस्टल ट्री लावल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात. यासोबतच करिअर आणि व्यवसायामध्येही फायदे आहेत.
घराचा पूर्व भाग आरोग्याशी संबंधित असतो. अशा परिस्थितीत घर किंवा ऑफिसच्या पूर्व दिशेला स्फटिकाचे झाड ठेवणे चांगले मानतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. रंगीबेरंगी स्फटिकाचे वृक्ष घरात ठेवल्यास घरात उर्जेचा समतोल राहतो. तसेच व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात.
कुठून विकत घ्याल?
रत्नांच्या दुकानातून तुम्ही क्रिस्टल ट्री विकत घेऊ शकता. याशिवाय ऑनलाईन विकत घेण्याचा पर्याय जास्त सोयीचा आहे. ऑनलाईन खरेदी करताना खात्रीशीर वेबसाइटवरूनच खरेदी करा. याशिवाय खरेदी करण्याआधी उत्पादनाचे रिव्हिव्ह अवश्य वाचा. स्वस्त मिळण्याच्या नादात चुकीची वस्तू खरेदी करू नका.
(वरील माहिती फेंगशुई शास्त्राच्या मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कुठलाही हेतू नाही)