मुंबई : रविवार 14 नोव्हेंबर रोजी देवउठनी एकादशी साजरी आहे. ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योगनिद्रा पूर्ण केल्यानंतर जागे होतात. या एकादशीला देवोत्थान एकादशी (Devutthana Ekadashi) आणि प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) असेही म्हणतात.
देव जागे झाल्याच्या आनंदात भक्त त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. विशेष पूजा केली जाते. जे वर्षभर एकादशीचा उपवास करत नाहीत, ते या दिवशी उपवास करतात. देवउठनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाला संपूर्ण एकादशीचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. त्याचे पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो. परंतु जे व्यक्ती हे व्रत करु शकत नाहीत, त्यांनीही या दिवशी काही नियमांचे पालन करावे, अन्यथा व्यक्ती पापाचा भागीदार होऊ शकतो.
एकादशीला या 5 गोष्टी खाऊ नयेत –
1. देवउठनी एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. भाताला अन्नधान्य असे म्हणतात. हे देवतांचे अन्न मानले जाते. अशा स्थितीत या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्तीचे सर्व पुण्य नष्ट होतात.
2. एकादशी तिथीला जव, मसूरची डाळ, वांगी आणि सोयाबीन खाणे देखील वर्ज्य मानले जाते. तसेच कांदा, लसूण यांचा वापर जेवणात करु नये.
3. एकादशीच्या दिवशी भगवान नारायणाला पान अर्पण केले जाते, अशा स्थितीत व्यक्तीने पान खाऊ नये.
4. या दिवशी मांस, दारु आणि इतर तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये. संपूर्ण सात्विक आहार घ्यावा.
5. देवउठनी एकादशीच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये. दुसऱ्याच्या घरचे पाणीही पिऊ नये.
या गोष्टी लक्षात ठेवा –
एकादशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी घर झाडून घ्यावे. एकादशीच्या दिवशी झाडू लावणे टाळा. कारण, झाडू मारताना अनेक सूक्ष्मजीव चुकून मरतात. त्याचा पाप लागते.
केस, दाढी आणि नखे इत्यादी कापू नका. तसेच ब्रह्मचर्य पाळा.
एकादशीच्या रात्री उशिरापर्यंत जागरण करुन देवाचे भजन करावे. उपवासाच्या दिवशीही झोपू नये.
या दिवशी तुळशीची पूजा केली जाते, त्यामुळे तुळशीची पाने तोडण्याची चूक करु नका.
कोणाबाबतही वाईट बोलू नये, खोटे बोलू नये आणि चुगली करु नये. वडिलधाऱ्यांचा अपमान करु नका आणि घरात वाद करु नका.
Spiritual Trees | हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जातात ही झाडं, जाणून घ्या कोणत्या झाडाचं काय महत्त्व?https://t.co/CtYTht4Bd2#SpiritualTrees #specialtrees #Plants
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :