तुळजापूर देवस्थानाची बोगस वेबसाईट बनवून भाविकांना गंडा

| Updated on: Dec 16, 2023 | 3:11 PM

वेळेअभावी अनेकांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूला येणे शक्य होत नाही. सध्या ऑनलाईल व्याव्हाराची चलती असल्याने अनेक भाविक युपीआयद्वारे पुजेची आणि अभिषेकाची देणगी देतात. याचाच फायदा घेत ठगबाज सुनिल बोदले याने देवीच्या मंदिराशी मिळती जुळती वेबसाईट आणि मोबाईल ऍप बनवले आणि भाविकांना ऑनलाईल गंडा घालणे सुरू केले. 

तुळजापूर देवस्थानाची बोगस वेबसाईट बनवून भाविकांना गंडा
तुळजाभवानी माता
Image Credit source: Social Media
Follow us on

धाराशिव : तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तुळजाभवानी देवीच्या (Tulja Bhawani) नावाने बोगस वेबसाईट व मोबाईल ऍप काढून भाविकांची विविध पूजा करण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात आरोपी सुनिल बोदले याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपी सुनिल बोदल याने तुळजाभवानी मंदीर प्रशानाची कसलीही परवानी न घेता नावाशी साधर्म्य असणारे वेबसाईट व मोबाईल ऍप बनवले. तुळजाभवानी देवीचा फोटो व लोगो वापरुन ते श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानाचे अधिकृत ॲप असल्याचे भाविकांना भासवले.

पुजेच्या नावाखाली भाविकांकडून घेतले पैसे

वेळेअभावी अनेकांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूला येणे शक्य होत नाही. सध्या ऑनलाईल व्याव्हाराची चलती असल्याने अनेक भाविक युपीआयद्वारे पुजेची आणि अभिषेकाची देणगी देतात. याचाच फायदा घेत ठगबाज सुनिल बोदले याने देवीच्या मंदिराशी मिळती जुळती वेबसाईट आणि मोबाईल ऍप बनवले आणि भाविकांना ऑनलाईल गंडा घालणे सुरू केले.  वेबसाईट कधीपासून सुरू होती आणि किती भाविकांची दर्शनाच्या नावावर आर्थिक लूट करण्यात आली या बाबी तपासाअंती स्पष्ट होणार आहेत. भाविकांची खात्री पटावी म्हणून त्याने मंदिराचा लोगोही आपल्या वेबसाईट लावला. वेगवेगळ्या पुजा करण्यासाठी त्याने भाविकांकडून पैसे घेतले आणि मंदिर प्रशासनाची फसवणूक केली.

हे सुद्धा वाचा

तुळजापूर मंदिर कायमच राहते चर्चेत

तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांआधीच मंदिरात देवीचे पाऊण किलो वजनाचे सोन्याचे मुकूट आणि देवीचे पुरातन दागिण्यासह चांदिच्या वस्तू चोरी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या गैरव्याव्हारात संबंधीत पुजारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याआधी मंदिर प्रशासनाने ड्रेस कोड लागू केल्याने टिकेचा सामना करावा लागता होता.