Devshayani Ekadashi 2021 | देवशयनी एकादशीपासून देवतांचा शयनकाळ का सुरु होतो, जाणून घ्या याचं वैज्ञानिक महत्त्व

| Updated on: Jul 20, 2021 | 8:38 AM

आज 20 जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. आजपासून चातुर्मास सुरू होणार आहे. मान्यता आहे की भगवान चातुर्मासादरम्यान योग निद्रेमध्ये जातात. अशा परिस्थितीत या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण हिंदु धर्मग्रंथांमध्ये देवाचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण मानले जात नाही.

Devshayani Ekadashi 2021 | देवशयनी एकादशीपासून देवतांचा शयनकाळ का सुरु होतो, जाणून घ्या याचं वैज्ञानिक महत्त्व
देवशयनी एकादशीबाबत सर्व माहिती
Follow us on

मुंबई : आज 20 जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. आजपासून चातुर्मास सुरू होणार आहे. मान्यता आहे की भगवान चातुर्मासादरम्यान योग निद्रेमध्ये जातात. अशा परिस्थितीत या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण हिंदु धर्मग्रंथांमध्ये देवाचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण मानले जात नाही. म्हणूनच देवउठनी एकादशीच्या दिवशी जेव्हा जगाचे पालनकर्ता भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात, तेव्हा शुभ कार्ये सुरु होतात (Devshayani Ekadashi 2021 Know The Scientific Reason Behind Bedtime Of God And Evrything About Devshayani Ekadashi).

धार्मिकदृष्ट्या, भगवान विष्णूच्या शयनची सुरुवात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून मानली जाते, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. शास्त्रात देवशयनी ते देवउठनी एकादशीपर्यंतचा काळ हा देवाचा शयनकाळ मानला जातो. आपण देवाच्या शयनाच्या बऱ्याच धार्मिक कथा ऐकल्या असतील, परंतु आज येथे त्याचे शास्त्रीय महत्त्व देखील समजून घ्या आणि देवशयनी एकादशीपासून देवतांचा शयनकाळ का सुरु होतो आणि देवशयनी एकादशीची पूजा विधी आणि शुभ मुहूर्त याबद्दल जाणून घ्या –

देवशयनाचे वैज्ञानिक महत्त्व

संस्कृत साहित्यात “हरी” हा शब्द विशेषतः भगवान विष्णू, सूर्य, चंद्र आणि वायूसाठी वापरला जातो. चातुर्मासादरम्यान, सूर्य, चंद्र, वायु इत्यादी या सर्व प्रमुख शक्ती मंदावतात आणि वातावरणात त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या घटकांची कमतरता असते. यामुळे आपल्या शरीरात बरेच बदल होतात आणि आपली पाचन शक्ती कमकुवत होते. शास्त्रात भगवान हरी सर्वव्यापी मानले गेले आहेत. आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या तीन गुणांपैकी सत्त्वगुणाला आणि शरीरातील सात प्रमुख धातूंमध्ये पित्तला भगवान हरींचे प्रतिनिधी मानले जाते. अशा परिस्थितीत हा काळ हरीची उपासना करण्याचा खास काळ मानला जातो आणि व्यक्तीला सात्त्विक अन्न खाण्याचा आणि सात्विक जीवन जगण्याचा सल्ला दिला जातो.

सूर्य दक्षिणायन होतो

त्याचवेळी खगोलशास्त्रीय कारणांमुळे सूर्य कर्क राशीत दाखल होत दक्षिणायन झाले आहे आणि पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. कर्क राशी जलीय राशी आहे. अशा स्थितीत सूर्याने कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता कमी होते. यावेळी सूर्याची शक्ती कमकुवत होते. ही वेळ देवतांची रात्र मानली जाते. असे म्हणतात की या दरम्यान सर्व देवी-देवता योग निद्रेमध्ये जातात. कार्तिक महिन्यात पोहोचल्यावर सूर्य तूळ राशीत प्रवेश करतो. याच्या जवळपासच देवउठनी एकादशी असते. देवउठनी एकादशी हा देवतांच्या जागृतीचा दिवस मानला जातो. या दिवसापासून सर्व धार्मिक नियम पुन्हा लागू केले जातात आणि पुन्हा शुभ कार्य सुरु होतात.

देवशयनी एकादशीची पूजा कशी करावी

देवशयनी एकादशीला भगवान विष्णूच्या विग्रहांना पंचामृताने स्नान करावे आणि चंदन, धूप-दीप इत्यादींनी पूजा करावी. त्यानंतर, चांदी, पितळ इत्यादींनी बनविलेल्या पलंगावर बिछाणा घालून त्यावर पिवळ्या रंगाचा रेशमी कपडा घालून भगवान विष्णूंना त्यावर शयन करवावे. दिवसभर श्रद्धेनुसार व्रत ठेवा आणि देवाचे ध्यान करा. कोणाची निंदा किंवा वाईट गोष्टी करु नका. रात्री जागरण करा आणि दुसर्‍या दिवशी एका ब्राम्हणाला भोजन द्या आणि शक्य असेल ती दक्षिणा देऊन निरोप घ्या. त्यानंतर उपवास सोडा.

देवशयनी एकादशीचा शुभ मुहूर्त

देवशयनी एकादशी तिथी सोमवार 19 जुलै रोजी सकाळी 9.45 वाजेपासून सुरु झाली असून मंगळवार 20 जुलै रोजी रात्री 07: 17 पर्यंत राहील. उदय तिथी असल्याने हे व्रत 20 जुलै रोजी ठेवण्यात येणार आहे. 21 जुलै रोजी बुधवारी सकाळी 05:36 ते 08:21 या वेळेत उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त असेल.

Devshayani Ekadashi 2021 Know The Scientific Reason Behind Bedtime Of God And Evrything About Devshayani Ekadashi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaturmas 2021 : देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात, जाणून घ्या यामागील कथा आणि नियम

Lord Vishnu Birth | भगवान विष्णूंचा जन्म कसा झाला, गुरुवारी नारायणाची पूजा कशी करावी जाणून घ्या