मुंबई : Vivah Muhurat 2021 : दिवाळीनंतर लग्नाचा हंगाम सुरु होतो. ज्यांना हिवाळ्यात लग्न करायचे आहे, ते नोव्हेंबरनंतरच्या तारखांची म्हणजे दिवाळीनंतरच्या मुहूर्ताची वाट बघू लागतात. यामुळेच दिवाळीच्या नंतरचा शुभ मुहूर्त पाहून लोक लग्नाच्या तयारीला लागतात. अशा स्थितीत प्रत्येक वेळेप्रमाणे यंदाही विवाहांची शुभ मुहूर्तमेढ आली आहे. यावेळी लग्नासाठी फारच कमी मुहूर्त आहेत.
आज आम्ही तुम्हा सर्वांना या हंगामातील विवाहसोहळ्याच्या शुभ मुहूर्ताची माहिती देणार आहोत. यंदा फक्त 19 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत. म्हणजेच लग्नासाठी केवळ 15 मुहूर्त आहेत, ज्यामध्ये विवाह होऊ शकतात. हिंदूंमध्ये देवउठनी एकादशीपासून (Devuthani Ekadashi) विवाहांना सुरुवात होते.
यावर्षी 15 नोव्हेंबरला देवउठनी एकादशीपासून शुभ कार्याला सुरुवात होणार आहे. मात्र, यावेळी लग्नाचे मुहूर्त कमी असल्याने बहुतांश ठिकाणी लग्नसराई, हॉटेल आदींसाठी लोकांना अडचणी येत आहेत.
लग्नाचे मुहूर्त किती दिवस
या हंगामात देवउठनी एकादशीनंतर 15 नोव्हेंबरला आणि शेवटचा मुहूर्त 13 डिसेंबरला आहे. त्यानुसार या पुढील 2 महिन्यांत केवळ 15 शुभ मुहूर्त आहेत. तर पुढील वर्षी 15 जानेवारी 2022 पासून पुन्हा शुभ मुहूर्त सुरू होतील.
विवाहाचे शुभ मुहूर्त –
2021 मध्ये नोव्हेंबर महिन्यात 19, 20, 21, 26, 28, 29 आणि 30 केवळ 7 तारखाच लग्नासाठी शुभ असणार आहेत. याशिवाय डिसेंबर महिन्यात 8 शुभ मुहूर्त असून ते 1, 2, 5, 6, 7, 11, 12 आणि 13 तारखेला आहेत.
कोरोनामुळे सर्वांचेच मोठे नुकसान होत आहे. ज्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय हंगामी आहे, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. पण, यंदा लगीनसराईच्या मोसमापासून लग्नमंडप, हॉटेल्स ते बँड, ढोल, कॅटरर्स, मिठाईवाले आदींकडून या लोकांना काही फायदा होईल, अशी आशा आहे. कमी मुहूर्तामुळे आता लग्नमंडपाचे बुकिंग न झाल्याने अडचणी येत आहेत. याशिवाय बँड-बाज, ढोल, घोडी, बग्गी अशीच अवस्था आहे.
Goddess Lakshmi | लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हे विशेष उपाय करा, वैभव-संपत्ती वाढेलhttps://t.co/0b45sjBPsm#GoddessLakshmi #Prosperity #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Gangajal | जर तुम्हीही घरात गंगाजल ठेवत असाल तर या चुका करणे टाळा, अन्यथा समस्यांना आमंत्रण द्याल
Narak Chaturdashi 2021 : नरक चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय करा, हनुमानजी सर्व संकटं दूर करतील