Dhanlabha: घरात लक्ष्मीचे आगमण होण्याआधी मिळतात हे संकेत, अनेक जण करतात दुर्लक्ष

| Updated on: Jan 27, 2023 | 5:07 PM

हिंदू धर्मात, वास्तुशास्त्रामध्ये असे काही शुभ संकेत सांगण्यात आले आहेत, जे सांगतात की, तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. म्हणजे लवकरच तुम्हाला भरपूर धनलाभ (Dhanlabh Sign) होणार आहे.

Dhanlabha: घरात लक्ष्मीचे आगमण होण्याआधी मिळतात हे संकेत, अनेक जण करतात दुर्लक्ष
धनलाभ
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, ज्या घरात माँ लक्ष्मी वास करते, तिथे नेहमी अपार संपत्ती, सुख-समृद्धी असते, त्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. हिंदू धर्मात, वास्तुशास्त्रामध्ये असे काही शुभ संकेत सांगण्यात आले आहेत, जे सांगतात की, तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. म्हणजे लवकरच तुम्हाला भरपूर धनलाभ (Dhanlabh Sign) होणार आहे. जसे की, स्वप्नात पूर्वजांना पाहणे ही काही सामान्य गोष्ट नाही. पूर्वजांचे स्वप्न एखाद्या व्यक्तीसाठी चांगल्या वेळेची सुरुवात दर्शवते. ते लोक खूप भाग्यवान असतात, जे त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या स्वप्नात पाहतात. पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यावर असल्याचा हा पुरावा आहे. तथापि, पितरांना चांगल्या मुद्रेत पाहणे देखील आवश्यक आहे. उदाहरणार्थ, स्वप्नात पूर्वजांना हसताना, आशीर्वादाच्या स्वरूपात दिसणे किंवा जप करताना किंवा आनंदी मूडमध्ये बोलणे इ.

प्राणी आणि पक्षी

जर तुम्ही आयुष्यातील कठीण टप्प्याचा सामना करत असाल किंवा खूप गोंधळात असाल तर प्राणी आणि पक्षी यांचे दर्शन, त्यांचे घराच्या दारात आगमन हे खूप चांगले आणि शुभ लक्षण आहे. जर एखादी चिमणी किंवा पक्षी तुमच्या घरात शिरले आणि काही काळ तिथे थांबले तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते. हे जीवनातील सकारात्मक बदलाचे लक्षण आहे. जीवनात सुरू असलेल्या समस्या लवकरच दूर होणार आहेत. जीवनात लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील.

भक्ती करताना डोळ्यात अश्रू

अनेकदा भगवंताच्या भक्तीत तल्लीन झालेल्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. देवाशी एक विशेष प्रकारचा संबंध जाणवू लागतो. हे एक लक्षण आहे की देवाने स्वतः तुम्हाला बोलावले आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही मंदिरात यावे, त्याचे दर्शन घ्यावे आणि पूजेनंतर त्याचा आशीर्वाद घ्यावा. हे बऱ्याचदा घडते जेव्हा एखादी व्यक्ती खूप अस्वस्थ असते आणि या त्रासातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही.

हे सुद्धा वाचा

संतांचे दर्शन

जर तुम्हाला एखाद्या संताचे दर्शन मिळाले तर समजा लवकरच तुमचे भाग्य जागे होणार आहे. त्यांना देवाने पाठवलेले देवदूत मानले जाते. तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. तुमच्या अवतीभवती असलेल्या समस्या लवकरच दूर होणार आहेत. जर तुम्हाला ऋषी-मुनींच्या तपश्चर्या भूमीवर जाण्याची इच्छा असेल तर यालाही शुभ चिन्ह समजा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)