मुंबई, धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2022) दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. उद्या 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. भगवान धन्वंतरी (Dhanwantari) हे विष्णूचा अवतार आणि आयुर्वेदाचे जनक आहेत. धर्मग्रंथानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथानंतर भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन महासागरातून बाहेर पडले होते. भगवान धन्वंतरी यांचे भारतात मंदिरं देखील आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची गर्दी असते. चला जाणून घेऊया या मंदिरांबद्दल.
धनत्रयोदशीच्या दिवशी तामिळनाडूमध्ये असलेल्या रंगनाथस्वामी मंदिरात भक्तांची गर्दी असते. हे मंदिर भगवान धन्वंतरीला समर्पित आहे. या मंदिरात प्रसाद म्हणून औषधी वनस्पती दिल्या जातात.
तमिळनाडूमध्ये भगवान धन्वंतरीचे आणखी एक प्रसिद्ध मंदिर आहे. ते कोईम्बतूर येथे आहे.
हे मंदिर नेल्लुवाई येथे आहे. असे मानले जाते की या मंदिरात भगवान धन्वंतरीची मूर्ती अश्विनी देवांनी स्थापित केली होती. हे मंदिर 5000 वर्षे जुने आहे.
हे मंदिर भगवान धन्वंतरीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील देवतेची मूर्ती सुमारे 6 फूट उंच आहे. या मंदिरात लोण्याचा प्रसाद दिला जातो.
1. भांडी
धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे, परंतु बहुतेकांना कोणती धातूची भांडी खरेदी करावी हे माहित नाही. जर तुम्हाला शंका असेल तर पितळेची भांडी खरेदी करा आणि ती तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवा.
2. धणे
या दिवशी धने खरेदी करण्याचीही परंपरा आहे. धनत्रयोदशीला धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मीला पूजेत धने अर्पण करून नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवावे. तसेच या दिवशी कुंडीत किंवा अंगणात कोथिंबीर पेरावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)