Diwali 2021 : मुंबई : दिवाळीचा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणून साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला हा विशेष सण साजरा केला जातो. दिव्यांनी भरलेल्या या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा करतात. अशा वेळी दिवाळीच्या दिवशीही असे अनेक उपाय केले जातात, ज्यामुळे जीवनात आनंद येतो.
वैदिक मान्यतांच्या आधारे चपातीशी संबंधित अनेक लोकप्रिय उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याद्वारे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. सनातन धर्मात गायीला चपाती खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. एवढेच नाही तर कुंडलीशी संबंधित सर्व ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी चपातीशी संबंधित उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया दिवाळीत चपातीच्या या सोपे आणि प्रभावी उपाय –
काळ्या मुंग्यांना चपाती खायला द्या
जीवनात मान-सन्मान मिळवण्यासाठी दिवाळीला काळ्या मुंग्यांना चपाती खायला द्या. दिवाळीत मुंग्यांना चपाती खाऊ घातल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो.
आर्थिक समस्या दूर करा
दिवाळीच्या दिवशी बनवलेल्या पहिल्या चपातीचे चार समान भाग करा. यानंतर या चपातीचा एक भाग गायीला, दुसरा भाग काळ्या कुत्र्याला, तिसरा भाग कावळ्याला आणि चौथा भाग घराजवळील चौकात टाकावा. असे केल्यास तुमचे सर्व आर्थिक संकट दूर होतील.
चपातीच्या या उपायांनी नशीब उजळेल
खूप मेहनत करुनही जीवनात यश मिळत नसेल, तर या दिवशी मुंग्यांना हाताने चपाती द्यावी. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. एवढेच नाही तर दिवाळीच्या दिवशी तीन प्रकारच्या कच्च्या डाळी चपातीमध्ये मिसळून गायीला खायला द्यावे.
अडथळे दूर करण्यासाठी
जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी चपाती आणि साखर मिसळून त्यांचे लहान लहान तुकडे करुन ते मुंग्यांच्या वारुळाच्या आजुबाजुला टाका. यासोबतच सकाळी आंघोळ केल्यानंतर गायीला रोळी खाऊ घातल्यास फायदा होईल.
Diwali 2021 | देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असले तर दिवाळीच्या रात्री इंद्राने रचलेल्या महालक्ष्मी स्तोत्राचं पठण कराhttps://t.co/6FLF1eQpN4#Diwali2021 #DiwaliSpecial #GoddessLakshmi
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Diwali 2021: घरच्या घरी लक्ष्मीपूजन कसे करावे, जाणून घ्या पूजेची पद्धत
Narak Chaturdashi 2021 : नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘अशी’ करा पूजा, जीवनातील सर्व सुख होतील प्राप्त