मुंबई : जीवनातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने संपत्ती आणि धान्याचं सुख मिळते. देवी लक्ष्मीची उपासना-पूजेचा दिवस म्हणजे दिवाळी जो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सण मानला जातो. असे मानले जाते की दीपावलीच्या सणाला देवी लक्ष्मीची पूजा केल्यास वर्षभर आर्थिक बळ टिकून राहते. देवी लक्ष्मीच्या कृपेने संपत्तीचा साठा भरतो आणि सर्व प्रकारचे सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
दिवाळीच्या दिवशी रिद्धी-सिद्धी देणाऱ्या आणि आद्य पूजनीय मानल्या जाणाऱ्या गणपतीचीही विशेष पूजा केली जाते. ज्यांच्या कृपेने वर्षभरातील सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात. अशा स्थितीत शुभ आणि लाभ मिळण्यासाठी सर्वजण विधिपूर्वक गणपतीची पूजा करतात, विशेषत: देवी लक्ष्मीची.
दिवाळीत या देवतांची विशेष पूजा केली जाते –
दिवाळीच्या पवित्र सणाला गणेश आणि देवी लक्ष्मी यांच्याशिवाय धनाची देवता कुबेर, देवी काली आणि माता सरस्वती यांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. परंतु, या सर्वांसाठी केलेल्या विशेष पूजा करुन भगवान विष्णूची पूजा का केली जात नाही हा स्वतःमध्ये एक मोठा प्रश्न आहे. जो बऱ्याचदा लोकांच्या मनात येतो. तर भगवान विष्णूची पत्नी माता लक्ष्मीची पूजा संपूर्ण विधीनुसार लोक करतात.
दिवाळीच्या रात्री भगवान विष्णूशिवाय देवी लक्ष्मीची पूजा का केली जाते ते जाणून घेऊया –
दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीसह सर्व देवतांची विशेष पूजा केली जाते. पण, त्या रात्री भगवान विष्णूची पूजा केली जात नाही, कारण दिवाळीचा पवित्र सण चातुर्मासाच्या दरम्यान येतो आणि यावेळी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेत असतात. अशा परिस्थितीत कोणत्याही धार्मिक कार्यात त्यांची अनुपस्थिती स्वाभाविक आहे. यामुळेच संपत्तीची देवी लक्ष्मी विष्णूशिवाय दिवाळीला लोकांच्या घरी जाते.
त्याचवेळी, गणपती जे देवांमध्ये प्रथमपुजनीय मानले जातात. त्यांच्यासह इतर देवांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधित्व करतो. पण, दिवाळीनंतर, जेव्हा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेमधून उठतात, तेव्हा सर्व देवता पुन्हा एकदा श्रीहरीसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा करुन दीपावलीचा सण साजरा करतात, ज्याला देव दीपावली म्हणतात.
Dhanteras 2021 | धनत्रयोदशीच्या पूजेत हे उपाय केल्याने आरोग्य आणि समृद्धी लाभेलhttps://t.co/c6Q57FxfmQ#Dhanteras2021 #Diwali2021 #Dhanteras
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
PHOTO | Diwali 2021 : दिवाळीत ‘या’ पाच गोष्टी घरात आणल्याने घरात भरेल सुख-समृद्धीचे भांडार