मुंबई, दिवाळी येत आहे. दरवर्षी दिवाळीचा (Diwali 2022) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू धर्मात दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीपावलीला दिवाळी असेही म्हणतात. दिवाळीचा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय होय. या वेळी सोमवार, 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरात लक्ष्मी-गणेशाची पूजा केली जाते. माता लक्ष्मीच्या उपासनेने घरात सुख-समृद्धी येते. वाळीपूर्वी संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते. स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे अशी मराठीत म्हणत आहे. दिवाळीच्या दिवसात घरात स्वच्छता नसल्यास लक्ष्मीची कृपा होत नाही. त्यामुळे दिवाळीच्या पूजेपूर्वी ही ठिकाणे काळजीपूर्वक स्वच्छ करा.
1. ईशान्य
ज्योतिष शास्त्रानुसार ईशान्य कोपरा सर्वात महत्वाचा मानला जातो. ही दिशा देवतांची आहे असे मानले जाते. म्हणूनच प्रत्येक मंदिर ईशान्येला बांधले जाते. असे मानले जाते की, हा कोन स्वच्छ ठेवावा अन्यथा देवी लक्ष्मी घरात वास करत नाही. घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ईशान्य दिशा म्हणतात. या कोपऱ्यात अशा कोणत्याही अडगळीच्या वापरात नसलेल्या वस्तू ठेवू नये. घराचा ईशान्य कोन नेहमी स्वच्छ ठेवावा कारण यामुळे घराची वास्तू सुधारते.
2. ब्रह्मस्थान
वास्तुशास्त्रात घराच्या मध्यभागालादेखील महत्त्वाचे स्थान आहे. त्याला ब्रह्मस्थान म्हणतात. ही जागा कायम स्वच्छ ठेवली पाहिजे. या ठिकाणाहून अनावश्यक वस्तू काढून टाका. आहेत त्या वस्तू स्वच्छ ठेवाव्या. तुटलेली काचेची भांडी, तुटलेली पलंग अशी कोणतीही वस्तू या ठिकाणी ठेवू नये.
3. घराच्या या दिशा लक्षात ठेवा
दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराच्या पूर्वेकडील जागा स्वच्छ करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. घरात माता लक्ष्मी वास करते. त्याचबरोबर घराची उत्तर दिशा स्वच्छ ठेवणेही गरजेचे आहे. त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात.