मुंबई, दिवाळी (Diwali 2022) हा पाच दिवसांचा सण आहे, जो धनत्रयोदशीपासून (Dhanteras 2022) सुरू होतो. धनत्रयोदशीपासून दीपावलीपर्यंत लक्ष्मीच्या पूजेला (Diwali Upay) विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रात दिवाळीसोबत काही उपाय सांगितले आहेत. दिवाळीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यावर हे उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहील. ज्या घरांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथे लक्ष्मी कायम असते. महिलांचा आदर केला जातो तिथेच लक्ष्मी टिकते. घरात जर कायम आर्थिक चणचण राहत असेल तर दिवाळीच्या दिवशी काही उपाय केल्याने लाभ होतो. जाणून घेऊया या उपायांबद्दल.
दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर चांदीच्या भांड्यात कापूर जाळून लक्ष्मीची पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.
दिवाळीच्या संध्याकाळी वटवृक्षाच्या खोडाला गाठ बांधल्याने आर्थिक समस्येतून मार्ग निघतो. याशिवाय दिवाळीच्या दिवशी घराच्या सर्व दिशेला दिवे लावा. असे केल्याने घरातील गरिबी दूर होते.
दिवाळीच्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीची पूजा करणार आहेत, त्या ठिकाणी चार तोंडी दिवा लावावा. आम्ही चतुर्मुखी दिवा चारही दिशांचे प्रतीक आहे आणि तो प्रज्वलित केल्याने घरामध्ये चारही दिशांनी धन, सुख आणि समृद्धी येते. हा दिवा रात्रभर तेवत ठेवा.
देवी लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे पूजास्थानी 7, 11 आणि 13 कवड्या ठेवाव्यात. दुस-या दिवशी ती उचलून तिजोरीत ठेवावीत. यामुळे तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)