Diwali 2023 : कधी आहे यंदाची दिवाळी? लक्ष्मीपूजनाची तारीख आणि मुहूर्त

| Updated on: Oct 05, 2023 | 8:33 PM

Diwali 2023 हा प्रश्न वारंवार मनात येतो की दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशजींच्या पूजेला इतर देवतांपेक्षा इतके प्राधान्य का दिले जाते? चला, आज या प्रश्नाचे उत्तर आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया.

Diwali 2023 : कधी आहे यंदाची दिवाळी? लक्ष्मीपूजनाची तारीख आणि मुहूर्त
दिवाळी २०२३
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणपतीच्या पूजेला खूप महत्त्व आहे. त्यांच्या पूजेशिवाय हा सण अपूर्ण मानल्या जातो. पण हा प्रश्न वारंवार मनात येतो की दिवाळीत (Diwali 2023) लक्ष्मी आणि गणेशजींच्या पूजेला इतर देवतांपेक्षा इतके प्राधान्य का दिले जाते? चला, आज या प्रश्नाचे उत्तर आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया.   माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे हे आपण सर्व जाणतो. माता लक्ष्मीच्या कृपेनेच ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होऊ शकते. कार्तिक अमावस्येच्या पवित्र तिथीला धनदेवतेला प्रसन्न करून समृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात. दिवाळीपूर्वी येणारा शरद पौर्णिमा हा सण लक्ष्मी देवीच्या जयंतीप्रमाणे साजरा केला जातो.

दिवाळीत गणपती पूजेचे महत्त्व

गणपतीला बुद्धीची देवता म्हटले जाते. हिंदू धर्मात गणपतीच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी सुरू होत नाही. दिवाळीत गणपतीची पूजा करण्याचे हेही एक कारण आहे. तसेच धन देवीच्या उपासनेतून समृद्धीचे आशीर्वाद मिळाल्यानंतर माणसाला सद्बुद्धीची गरज असते. जेणेकरून तो पैसा योग्य कामांसाठी वापरू शकेल. हे प्रथम पूज्य गणपती, आम्हाला बुद्धी आणि योग्य मार्गावर पुढे जाण्याचे वरदान दे, ही प्रार्थना दिवाळीला गणपतीची पूजा करतांना केली जाते.

दिवाळी 2023 निशिता काळ मुहूर्त

शास्त्रानुसार दिवाळीच्या मध्यरात्री म्हणजेच निशिता काल मुहूर्तावर देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते. धनदेवतेची पूजा करण्यासाठी हा शुभ काळ सर्वोत्तम मानला जातो. यावेळी देवी लक्ष्मी घरोघरी फिरते आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने हजारो रूपात सर्वव्यापी लक्ष्मीची प्राप्ती होते.

हे सुद्धा वाचा
  • लक्ष्मी पूजा – 12 नोव्हेंबर 2023, रात्री 11:39 – 13 नोव्हेंबर 2023, 12:32 am (कालावधी – 53 मिनिटे)
  • सिंह राशी – 12:10 am – 02:27 am
    दिवाळी लक्ष्मी पूजनासाठी शुभ चौघडीया मुहूर्त

काय आहे धार्मिक मान्यता?

कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. तर याच्या 15 दिवस आधी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा सण शरद पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. धार्मिक परंपरेनुसार, लक्ष्मी देवीच्या पूजेचा मुख्य दिवस शरद पौर्णिमा आहे तर देवी कालीची पूजा हा दिवाळीचा मुख्य दिवस असावा. याचे कारण म्हणजे अमावस्येची रात्र ही माता कालरात्रीची रात्र असते तर शरद पौर्णिमेची रात्र ही धवल रात्र असते आणि देवी लक्ष्मीचा प्रकट दिन देखील असतो. शरद पौर्णिमेला समुद्रमंथनाच्या वेळी महासागरातून लक्ष्मीचा जन्म झाला.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)