मुंबई : ज्या घरामध्ये देवी लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते, तिथे ती निवास करते. धार्मिक शास्त्रानुसार, देवी लक्ष्मी धन, संपत्ती आणि वैभवाचा वर्षाव करते. परंतु ती चंचल स्वभावाची आहे. तिला असे म्हटले जाते कारण ती कुठेही स्थिर राहात नाही. ज्याच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही.
एवढेच नाही तर अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मी घरातून कायमचे निघून जाते. अशा परिस्थितीत, आपल्या सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की कोणकोणत्या कारणांमुळे देवी लक्ष्मी घरातून निघून जाते, त्यामुळे तुम्ही त्या चुका कधीही करु नये.
उष्टी भांडी ठेवू नका
अनेकदा लोक घरामध्ये उष्टी भांडी पसरवतात किंवा ते उष्टी भांडी रात्री तशीच ठेवतात आणि सकाळी धुतात, पण असे करणे योग्य नाही. घरामध्ये कधीही उष्टी भांडी ठेवू नये. यामुळे लक्ष्मीची कृपा थांबते. रात्री नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ करुनच झोपावे.
निरुपयोगी वस्तू घरात ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशेची प्रमुख देवता कुबेर आणि संपत्तीची देवी लक्ष्मी आहे, जी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत घरामध्ये कचरा किंवा निरुपयोगी वस्तू कधीही ठेवू नये, विशेषतः उत्तर दिशेला.
चुलीवर भांडी ठेवू नका
स्वयंपाकघरात चुलीवर रिकामी भांडी कधीही ठेवू नका, ते अशुभ आहे. स्वयंपाकघरातील स्टोव्ह स्वच्छ ठेवला पाहिजे, तो स्वच्छ केला पाहिजे. पुराणात सांगण्यात आले आहे की स्टोव्हवर रिकामी भांडी सोडल्याने घरात दारिद्र्य येते, जर घरात स्टोव्हवर रिकामी भांडी ठेवली तर ती कधीही प्रगती आणत नाही.
वेळेवर झाडू लावा
शक्यतोवर तुम्ही सूर्योदयापूर्वी घरात झाडून काढा, पुसून टाका. जर सूर्योदयानंतर घर झाडून घेतल्यानंतर ते पुसले तर दुर्दैवाचे सूचक मानले जाते. देवी लक्ष्मी सकाळी घरी येते, ती स्वच्छतेने आनंदी झाल्यानंतर तिथे निवास करते. जर काही कारणास्तव झाडू वापरावा लागला तर घराची घाण घरातच ठेवा, सकाळी स्वच्छ करुन फेकून द्या.
हाताने चंदन चोळू नका
चंदनाला कधीही एका हाताने चोळू नये, यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. देवाची पूजा करताना नेहमी कुठल्या भांड्यात चंदन काढा नंतर देवाला लावा.
Diwali 2021 | दिवाळीला विष्णूशिवाय देवी लक्ष्मीची पूजा का केली जाते, जाणून घ्याhttps://t.co/VCGKY9BBdf#Diwali2021 #LordVishnu #GoddessLakshami
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Dhanteras 2021 | धनत्रयोदशीच्या पूजेत हे उपाय केल्याने आरोग्य आणि समृद्धी लाभेल
PHOTO | Diwali 2021 : दिवाळीत ‘या’ पाच गोष्टी घरात आणल्याने घरात भरेल सुख-समृद्धीचे भांडार