मुंबई : हनुमानजी (Hanuman) एक असे देवता आहेत जे कलयुगात पृथ्वीवर विराजमान आहेत, असं मानलं जातं. भगवान हनुमानाची पूजा आराधना केल्याने मनुष्य प्रत्येक प्रकारच्या भयातून मुक्त होऊन जातो, अशीही मान्यता आहे. यांची पूजा केल्याने आत्मविश्वासात वृद्धी होते. बहुतेक लोक हनुमान चालीसाचं (Hanuman Chalisa) पठन करतात. हे लाभदायक असतेचसोबतच जर बजरंग बाणाचं (Bajrang Baan) पठन केलं तर यानेही भक्तांवर बजरंगबलीची कृपा राहाते (Do not Do These Things On Tuesday Lord Hanuman Will Get Angry).
मंगळवारचा दिवशी हनुमानजींना समर्पित असतो. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होतं. अशी मान्यता आहे की मंगळवारी पूजा केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आपल्या भाविकांच्या इच्छा पूर्ण करतात. हनुमानजींना संकट मोचकही म्हटलं जातं. हनुमानजी भगवान श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त आहेत. हनुमानजी हे महादेवाचे अवतार असल्याचं मानतात. हनुमानजी यांची पूजा केल्याने जीवनात येणाऱ्या समस्यांमधून मुक्तता मिळते.
हनुमानजी यांची पूजा मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी करणे विशेष लाभदायक मानलं जातं. हनुमानजी यांची पूजा विधीवत केली पाहिजे. असं केल्याने पूजेचा पूर्ण लाभ प्राप्त होईल. मंगळवारच्या दिवशी उपवास ठेवल्याने हनुमानजींचा आर्शीवाद प्राप्त होतो. हनुमानजींची पूजा सकाळी स्नान करुन मग करावी. हनुमानजींच्या पूजेत स्वच्छता आणि नियमांचं विशेष पालन केलं पाहिजे. त्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्यावी –
– हनुमान चालीसाचं पठन हनुमानजींच्या मूर्ती किंवा फोटो समोर करावं
– तसेच एका पात्रात गंगाजलचे काही थेंब मिसळून ठेवा
– पूजेनंतर हे जल प्रसाद म्हणून ग्रहण करा
– हनुमानजींच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा
– हनुमानजींना मंगळवारीला चोला अर्पित केल्याने ते अधिक प्रसन्न होतात
– हनुमानजींना लाडू, गुळ आणि चण्याचा प्रसाद दाखवा
– पूजा समाप्त झाल्यावर याला प्रसाद म्हणून ग्रहण करा
ॐ श्री हनुमंते नम:
– हनुमानजींच्या पूजेत नियमांचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी अस्वच्छतेपासून दूर राहा. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
– मनात चुकीचे विचार येऊ देऊ नका.
– क्रोध आणि लोभापासून दूर राहा.
– या दिवशी कुणाचा अपमान आणि अनादर करु नये.
गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व…https://t.co/DALIjxvGxU#LordGanesha #ganpati #Durva
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
Do not Do These Things On Tuesday Lord Hanuman Will Get Angry
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Holi Bhai Dooj 2021 | आज आहे होळी भाऊबीज, जाणून घ्या या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण का करावं?