हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिव आणि पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केले जाते. असे मानले जाते की यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. सोमवार हा महादेवाला समर्पित दिवस आहे. या दिवशी महादेवाची उपासना केल्याने मनाला शांती मिळते, जीवनात सुख-समृद्धी येते. सोमवती अमावस्येला दान केल्याने आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. पंचांगानुसार सोमवती अमावस्या 30 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 04:01 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 21 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3:56 वाजता समाप्त होईल. 30 डिसेंबरला अमावस्या असणार आहे.
शनी आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस विशेष आहे. शनि देवाच्या साडे सातीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शनि देवाला मोहरीचे तेल अर्पण करावे. या दिवशी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नी दोघांनी मिळून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. तसेच ‘ओम पितृभ्यै नमः’ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. असे मानले जाते की यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि पती-पत्नीमध्ये समन्वय साधला जातो.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)