चुकूनही 6 गोष्टी दान करु नका, नाहीतर आयुष्यात प्रॉब्लेमच प्रॉब्लेम येतील

| Updated on: Oct 26, 2021 | 10:43 AM

दान ही गोष्ट प्रत्येक धर्मामध्ये श्रेष्ठ मानली जाते. सनातन धर्मामध्ये चार युगांतील निरनिराळ्या कर्मांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. असे म्हटले आहे की- सत्ययुगातील तप, त्रेतामधील ज्ञान, द्वापरातील यज्ञ आणि कलियुगातील दान यानेच मनुष्याचे कल्याण होऊ शकते.

चुकूनही 6 गोष्टी दान करु नका, नाहीतर आयुष्यात प्रॉब्लेमच प्रॉब्लेम येतील
donation
Follow us on

मुंबई : दान ही गोष्ट प्रत्येक धर्मामध्ये श्रेष्ठ मानली जाते. सनातन धर्मामध्ये चार युगांतील निरनिराळ्या कर्मांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. असे म्हटले आहे की- सत्ययुगातील तप, त्रेतामधील ज्ञान, द्वापरातील यज्ञ आणि कलियुगातील दान यानेच मनुष्याचे कल्याण होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने जीवनात दान करत राहिले पाहिजे. पण दान करण्याचेही काही नियम आहेत. दान नेहमी भक्तिभावाने व नम्रतेने करावे. तसेच, देणगी शक्य तितकी गुप्त ठेवा. गुप्त दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. दान केल्यानंतर कोणत्याही प्रकारची अपेक्षा करू नये. याशिवाय अशा काही गोष्टी आहेत, ज्या व्यक्तीने दान करणे टाळावे.

या 6 वस्तू दान करू नका

1. शक्यतो स्टीलची भांडी दान करू नये. विशेषत: जी भांडी तुमच्या घरात ठेवली आहेत, त्यांचे दान टाळावे. याचा वाईट परिणाम कुटुंबाच्या सुख-समृद्धीवर होऊ शकतो.

2. अन्न आणि पाणी महादान मानले जाते. त्यामुळे गरजू आणि गरिबांना अन्नदान करा आणि अन्नधान्य दान करा. परंतु नेहमी ताजे अन्न दिले पाहिजे. शिळे अन्न कोणालाही दान म्हणून देऊ नका.

3. पुस्तके, ग्रंथ इत्यादी गरजूंना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण या गोष्टी फाटू नयेत. तुम्ही एकतर विद्यार्थ्याला नवीन प्रती आणि पुस्तके दान करा किंवा पुस्तके नीट दुरुस्त करून दान करा, जेणेकरून ते एखाद्याला उपयोगी पडतील.

4. लोक अनेकदा शनिवारी तेल दान करतात. पण हे तेल शुद्ध असले पाहिजे. म्हणजेच, आपण आधीच वापरले तेल दान करु नये.

5. प्लास्टिकच्या वस्तू दान करणे देखील टाळावे. प्लास्टिकच्या दानाचा व्यवसायावर परिणाम होतो, असे मानले जाते. याशिवाय चाकू, कात्री, तलवार इत्यादी धारदार वस्तू दान केल्याने कुटुंबातील सुख-शांती भंग पावते. त्यामुळे कोणतीही तीक्ष्ण वस्तू दान करू नका.

6. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. यामुळे घरातील गरिबी दूर होते, त्यामुळे झाडू कोणालाही दान करू नये. ज्योतिषाच्या मते, झाडू दान केल्याने आर्थिक नुकसान होते.

( टिप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…)
इतर बातम्या :

इतर बातम्या :

स्वार्थी लोकांपासून लांब राहायचंय? मग या 4 राशींपासून दूर राहा

Zodiac Signs | अत्यंत विश्वासू असतात या 4 राशीच्या व्यक्ती, ठरतात बेस्ट सिक्रेट कीपर

प्रामाणिक जोडीदाराच्या शोधात आहात? 4 राशी ठरतील सर्वेत्तम पर्याय