मुंबई : शनिदेवाची पूजा केल्याने सर्व कष्ट दूर होतात अशी मान्यता आहे (Do Not Keep Shani Dev Murti At Home). तसेच, ज्या लोकांची साडेसाती सुरु आहे त्यांनाही याचा मोठा फायदा होतो. मान्यता आहे की शनिदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी मूल नक्षत्रयुक्त शनिवारपासून सुरु करुन सात शनिवारपर्यंत शनिदेवाची पूजा करुन उपवास ठेवावे. पूर्ण नियमानुसार पूजा आणि उपवास केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा होते. तसेच भक्तांची सर्व दु:खही दूर होतात. शनिदेवाच्या क्रोधपासून वाचणे अत्यंत गरजेचं असते अन्यथा मनुष्यावर अनेक प्रकारचे दोष लागतात (Do Not Keep Shani Dev Murti At Home Know The Reason Behind It).
हिंदू धर्मातील लोक सकाळी-सायंकाळी आपल्या घरातील पूजास्थळी देवाचे दर्शन आणि त्यांची आराधना करतात. घरात असलेल्या पूजा स्थळी अनेक देवी-देवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या असतात. शास्त्रात काही देवी-देवता असेही आहेत ज्यांच्या मूर्त्या किंवा फोटो घरात ठेवणे वर्जित मानलं जातं. यापैकीच एक म्हणजे शनिदेव यांची मूर्ती. शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे वर्जित आहे. शास्त्रांनुसार शनिदेवाची मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नये, यांची पूजा घराच्या बाहेर एखाद्या मंदिरात करावी असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
मान्यता आहे की शनिदेवाला श्राप मिळाला होता की ते ज्या कोणाला पाहातील तो अनिष्ट होऊन जाईल. शनिदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी घरात त्यांची मूर्ती ठेवली जात नाही. जर तुम्ही मंदिरातही शनिदेवाच्या दर्शनासाठी जाल तर त्यांच्या पायाकडे पाहावे त्यांच्या डोळ्यात पाहून दर्शन कधीही करु नये. अशात जर तुम्ही घरात शनिदेवाची पूजा करु इच्छित असातल तर मनातल्या मनात त्यांचं स्मरण करा. सोबतच शनिवारच्या दिवशी हनुमानजींचीही पूजा करा आणि शनिदेवाचंही स्मरण करा. यामुले शविदेव प्रसन्न होतात.
– राहु-केतूची मूर्ती
– नटराजची मूर्ती
– भैरवची मूर्ती
Hanuman Ji | बजरंगबली कृपा हवी असेल तर मंगळवारच्या दिवशी ‘हे’ उपाय कराhttps://t.co/kDz9BFzAsP#Hanuman
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2021
Do Not Keep Shani Dev Murti At Home Know The Reason Behind It
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
रामायण काळातील वैशिष्ट्यपूर्ण विमानं, अत्याधुनिक तंत्रज्ञानही का पडते फिके?
Hanuman Ji | बजरंगबलीची कृपा हवी असेल तर मंगळवारच्या दिवशी ‘हे’ उपाय करा