मुंबई : हिंदू धर्मात तुळशीचं मोठं महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचा सर्वाधिक वापर पूजा-अर्चनेत (Tulsi Plant Leaves) केला जातो. तुळशीमध्ये अनेक औषधीय गुण असतात. ज्यामुळे याचा वापर अनेक प्रकारच्या आजारांसाठीही केला जातो. अशी मान्यता आहे की जर घरात तुळशीचं रोप लावलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते (Do Not Toer Tulsi Plant Leaves On Sunday And Tuesday).
अनेकांकडे स्नान केल्यानंतर तुळशीची पूजा केली जाते. तसेच, काही लोक सकाळी उठल्यावर तुळशीचा चहा पिणे पसंत करतात. पण, जर तुम्ही तुळस तोडत असाल तर एका बाब लक्षात ठेवणे गरजेचं आहे.
तुळशीचे रोपाबाबत अशी मान्यता आहे की रविवारी, सूर्य ग्रहण, संक्रांत, द्वादशी, चंद्रग्रहणच्या दिवशी आणि सायंकाळी तुळशीच्या पानं चुकूनही तोडू नये. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी मां व्रती असते आणि जर या दिवशी तुळशीची पानं तोडली तर घरात दारिद्र्य येतं. त्यामुळे रविवारच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नका. अनेकजण असं मानतात की मंगळवारच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये कारण या दिवसाला लोक क्रूर वार मानतात.
तुळशीची पानं कधीही नखांनी ओढून तोडू नका. तुळशीची पानं कधीही चावू नये. जीभेवर ठेवून चोखायला हवं. शास्त्रांनुसार, तुळशीच्या रोपाला राधेचं रुप मानलं जातं. त्यामुळे कधीही तुळशीच्या पानांना विना स्नान करता तोडू नये. हे वाईच मानलं जातं.
अशात पानं पूजा कार्यात वापरले जात नाही आणि भगवानही ते स्वीकार करत नाहीत. तुळशीला राधेचा अवतार मानलं जातं आणि राधा राणी सायंकाळी लीला करते. अशात सायंकाळच्या वेळी तुळशीच्या पानांना तोडण्यास मनाई असते. जर पानं तोडणे गरजेचं असेल तर त्यापूर्वी झाडाला हलवून घ्या.
पूजा करताना देवाला अक्षता का अर्पण केल्या जातात, जाणून घ्या!https://t.co/aJOmcTkeW9#Spiritual #Akshat
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 17, 2021
Do Not Toer Tulsi Plant Leaves On Sunday And Tuesday
संबंधित बातम्या :
स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसत असतील तर सावधान, असू शकतात वाईट संकेत
Vinayak Chaturthi 2021 Upay | घरात सुख-समृद्धी हवी असेल तर विनायक चतुर्थीला ‘हे’ उपाय करा