मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्याला आपल्या नातेवाईक, मित्र, बँक इत्यादींकडून कर्ज घ्यावे लागते. परंतु असे म्हटले जाते की कर्ज हा एक असा आजार आहे जो एकदा लागला की लवकर दूर होत नाही. बर्याच वेळा आपण लोकांकडून घेतलेले कर्ज परत करण्यास सक्षम नसतो. अशीच परिस्थिती सावकाराची देखील असते, बर्याचदा तो असा विचार करत असतो की त्याने कधी कोणाला कर्ज द्यावे (Do These Remedies To Get Rid From Debt And Know The Rules For Debt).
कर्ज घेण्याचा आणि देण्याचा संबंध दिवस आणि नक्षत्रांशी संबंधित आहे. ज्या दिवशी आपण एखाद्याकडून कर्ज घेता किंवा देता त्या दिवशी त्याचा चांगला परिणाम होतो. सनातन परंपरेनुसार, खास दिवस आणि मुहूर्तात कर्ज घेण्याबाबत आणि देण्याबद्दल वर्णन केले गेले आहे. तर आपण कर्ज घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घ्या –
एखाद्याकडून पैसे घेताना आपण दिवसाची विशेष काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, मंगळवारी आपण चुकूनही कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. कारण या दिवशी घेतलेलं कर्ज परत करण्यात खूप कष्ट लागतात.
मंगळवारी ज्याप्रमाणे कर्ज घेतले जात नाही त्याचप्रमाणे बुधवारीही एखाद्याला चुकूनही कर्ज देऊ नये. मान्यता आहे की, बुधवारी दिलेले कर्ज परत मिळण्याची शक्यता खूप कमी असते.
हस्ते नक्षत्र युक्त रविवार, संक्रांती वृध्दी योग आणि मंगळवारला चुकूनही कर्ज घेऊ नये. कारण, त्या काळात घेतलेले कर्ज हे जे लोक घेतात त्यांच्या वंशाच्या मुलाकडे जाते. म्हणजेच, दीर्घकाळ यातून कोणतेही तारण मिळत नाही.
भरणी, कृतिका, शतभिषा, आद्र, श्लेशा, मघा, मूल, 3 उत्तरा, 3 पूर्वा, हस्त, ज्येष्ठा, भद्रा व्यतिपात नक्षत्रांचा योग असणे, व्यवसायात गुंतणे, एखाद्याला काम देणे, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास ते पैसे कधीही परत मिळत नाही.
या कोरोना कालावधीत जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली आहात आणि सर्व प्रयत्न करुनही त्यातून मुक्त होऊ शकत नसाल तर कर्जाचे दूर करण्यासाठी आपण मंगळवारी एकदा हा महान उपाय केला पाहिजे. मंगळवारी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने “ऋणमोचक मंगल स्तोत्र”चं पठण करावे. जे लोक नेहमी कर्जाने वेढलेले असतात आणि त्यांना हवे असले तरीही त्यातून मुक्त होऊ शकत नसतील त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे.
कोणत्या राशीने हिरा परिधान करावा, कोणी नाही, जाणून घ्याhttps://t.co/RLKJsXPYR5#Diamond #DiamondGemstone #ZodiacSigns
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 10, 2021
Do These Remedies To Get Rid From Debt And Know The Rules For Debt
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Hanuman Ji | हनुमानजींना संकटमोचन का म्हटलं जातं, जाणून घ्या
Chaturmas 2021 | श्री हरिचा आशीर्वाद हवा असेल तर चातुर्मासात चुकूनही ‘ही’ कामे करु नये