बुधवारी करा हे 7 उपाय, कधीच भासणार नाही पैशांची कमी

| Updated on: Jan 08, 2025 | 7:29 PM

बुधवार हा वार गणपतीला अतिशय प्रिय आहे असे मानले जाते. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर बुधवारी काही विशेष उपाय केल्याने गणपतीची कृपा कायम राहते.

बुधवारी करा हे 7 उपाय, कधीच भासणार नाही पैशांची कमी
astrology
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिंदू धर्मानुसार बुधवारचा दिवस हा गणपतीला अतिशय प्रिय असल्याचं सांगितले जाते. बुधवारी गणपतीची पूजा केली जाते. गणपतीची पूजा केल्याने बुध ग्रह प्रसन्न होतो. कुंडलीत बुध ग्रहाची योग्य स्थिती असेल तर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. ज्यामुळे व्यवसायात इच्छित यश मिळते. याशिवाय उत्पन्न आणि सौभाग्य ही वाढते. ज्योतिष शास्त्रामध्ये बुधवारी काही विशेष उपाय करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. हे उपाय केल्याने व्यक्तीचे नशीब बदलू शकते याशिवाय आर्थिक समस्या दूर होतात. जर तुम्हाला करिअर किंवा बिजनेस मध्ये प्रगती करायची असेल तर बुधवारी काही उपाय तुम्ही आवश्य करा.

1. जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल आणि त्यातून कायमची सुटका हवी असेल तर बुधवारी तुम्ही गणपतीची पूजा करा आणि पूजेच्या वेळी गणपतीला उसाच्या रसाचा अभिषेक करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो.

2. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गणपतीला बुधवारी शमीची पाने आणि सुपारी अर्पण करा. हे अर्पण करताना ‘वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥’ या मंत्राचा जप करा.
3. घरात काही वास्तुदोष असेल आणि तो दूर करायचा असेल तर बुधवारी अंघोळ झाल्याच्या नंतर ध्यान करून कृष्णाला बासरी अर्पण करा आणि ही बासरी उत्तराभिमुख असलेल्या खोलीत ठेवा. हा उपाय केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतो.

4. सारखी आर्थिक अडचण राहत असेल तर बुधवारी गणपतीची भक्ती भावाने पूजा करा. तसेच पूजेच्यावेळी गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा. हा उपाय केल्याने पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.
5. व्यवसायातून लाभ आणि प्रगती हवी असेल तर बुधवारी गणपतीची पूजा करा आणि गणपतीला 11 किंवा 21 दुर्वा अर्पण करा. दूर्वा अर्पण करताना गणपती स्तुती म्हणावी हा उपाय केल्यास व्यवसायामध्ये यश मिळते.

6. गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बुधवारी पूजा केल्यानंतर गहू, बाजरी, तांदूळ, हिरव्या पालेभाज्या, फळे इत्यादी वस्तूंचे दान करा. दान केल्यामुळे बुध ग्रहाच्या आशीर्वादासह गणपतीची कृपा होते.

7. तुम्हालाही बुध ग्रहाची कृपा मिळवायची असेल तर बुधवारी पूजा करताना गायीच्या कच्च्या दुधात दुर्वा मिसळून गणपतीला अभिषेक करा. यामुळे घरात सुख-समृद्धी येथे आणि सौभाग्य वाढते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)