मुंबई : हिंदू शास्त्रात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानली जाते. ही वनस्पती लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते. ही औषधी म्हणून देखील वापरली जाते. असे म्हणतात की जेथे तुळस असते, तिथे नकारात्मक ऊर्जा वास करत नाही. भगवान विष्णूच्या पूजेत तुळसचा वापर केला जातो. याशिवाय, त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते. मान्यता आहे की, तुळशीची नियमित पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते. ज्योतिष शास्त्रानुसार घरगुती त्रास, लग्नाला उशिर होणे, व्यवसायातील तोटा या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जाऊ शकतो. जाणून घ्या त्या उपायांबाबत (Do These Tulsi Upay To Get Rid From Bussiness Issues And Delay In Marriage) –
ज्योतिष शास्त्रानुसार, पितळच्या कलशात पाणी घ्या, त्या पाण्यात 4 ते 5 तुळशीची पाने घाला आणि सुमारे 24 तास ते तसेच राहू द्या. दुसर्या दिवशी आंघोळ केल्यावर हे पाणी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर शिंपडा. याशिवाय, घराच्या इतर भागातही शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. मान्यता आहे की हा उपाय केल्याने, आपल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात. हे लक्षात ठेवा की हे कार्य करीत असताना कोणीही आपल्याला पाहणार नाही आणि कोणीही व्यत्यय आणणार नाही. यामुळे उपाय प्रभावहीन होतो.
जर मुलीच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा तिला इच्छित जोडीदार मिळत नसेल तर त्या मुलीने तुळशीच्या झाडाला दररोज पाणी घालावे आणि आपली इच्छा सांगावी. मान्यता आहे की हा उपाय केल्याने विवाहाचे योग बनतात.
व्यवसाय करणार्या व्यक्तीला आपला व्यवसाय नेहमी वाढतच जावा असं वाटतं. व्यवसायात फायदा आणि तोटा दोन्ही होतात. व्यवसायात होणाऱ्या नुकसानीमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर दर शुक्रवारी स्नान करुन तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे. यानंतर काही मिठाईचे नैवेद्य द्या आणि उर्वरित प्रसाद एका विवाहित महिलेला दान करा. मान्यता आहे की याने हळूहळू व्यवसायाचे नुकसान कमी होऊ लागते.
वास्तू दोषांमुळे तुमचे काम खराब होऊ लागते. वास्तुशास्त्रानुसार, तुळस सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करते. जर, आपण वास्तू दोषांच्या समस्येवरुन जात असाल तर घराच्या दक्षिण-पूर्वेकडील दिशेला तुळशीची लागवड करा आणि नियमितपणे पाणी द्या आणि तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरातील त्रास दूर होईल. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.
Vastu Tips | घरात ठेवलेल्या या वस्तूंमुळे आर्थिक समस्या वाढू शकतात, तात्काळ घराबाहेर फेका…https://t.co/teFhogkWo7#VastuTips #Vastudosh #Vastushastra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2021
Do These Tulsi Upay To Get Rid From Bussiness Issues And Delay In Marriage
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vastu Tips | कुठल्या दिशेचा वास्तुदोष दूर करण्यासाठी कुठल्या देवाची पूजा करावी, जाणून घ्या