मुंबई : एकादशी प्रमाणेच प्रदोष व्रतलाही (Budh Pradosh Vrat 2021) खूप पुण्यदायी मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळला जातो. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो.प्रदोष व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित असतो, त्यामुळे या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. या व्रताचे शास्त्रात एक कल्याणकारी व्रत म्हणून वर्णन केले गेले आहे. (Do These Upay On Budh Pradosh Vrat 2021 To Plesed Mahadev).
आषाढ महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत आज 7 जुलै 2021 रोजी बुधवारी आहे. बुधवारचा प्रदोष बुध प्रदोष व्रत म्हणूनही ओळखले जाते. मान्यता आहे की भोलेनाथ आपल्या भक्तांची भक्ती पाहून खूप लवकर प्रसन्न होतात. महादेव मनुष्य, राक्षस, भुत, यक्ष इत्यादींचे आराध्य आहेत. बुधवारी प्रदोष व्रत केल्याने घरातील मुलांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांना तीव्र बुद्धी मिळते. –
? प्रदोष व्रत आरंभ – 7 जुलै दुपारी 01:02 वाजता
? प्रदोष व्रत समाप्त – 8 जुलै 2021 रोजी पहाटे 3.20 वाजता
? भगवान शिवच्या पूजेचा शुभ मुहूर्त – संध्याकाळी 07:12 ते 09:20
1. प्रदोष व्रताच्या दिवशी घरातील वृद्ध, लहान मुलांच्या हातून मिष्ठान आणि हिरव्या वस्तू दान करा. प्रदोष व्रताच्या दिवशी गणेशाला 5 वेलची, 5 सुपारी आणि 5 मोदक अर्पण करा.
2. या दिवशी गणेशासमोर तुपाचा दिवा लावावा आणि “ओम गं गणपतये नमः” मंत्रांचा जप करावा. या व्रताचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल.
3. जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रहाचा दोष असेल तर देवी दुर्गा आणि गणेशाची पूजा करा. याशिवाय गणेशजींना 11 जास्वंदाची फुले आणि हिरवे दूर्वा अर्पण करा.
4. या दिवशी पूजा केल्यावर गरजू लोकांना जेवण द्या.
5. संध्याकाळी प्रदोष काळात शिवलिंगावर पाण्यात कच्चे दूध मिसळून अभिषेक करावा आणि तिळाच्या तेलामध्ये चौमुखा दीप प्रज्वलित करुन भगवान शंकरांच्या मंत्रांचा जप करावा. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
– शास्त्रानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते.
– प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा.
– या दिवशी भाविक निर्जल किंवा फलाहार उपवास ठेवतात.
– भांग, धतुरा, बेलपात्र, फुले आणि जलने भगवान शंकरांचा अभिषेक करावा.
– पूजेवेळी देवी पार्वतीला लाल ओढणी आणि श्रृगांराच्या वस्तू अर्पण कराव्यात.
– विधीवत शिव पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबातील सर्व त्रास दूर होतात.
Pradosh Vrat 2021 | आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत, जाणून घ्या बुध प्रदोष व्रत कथाhttps://t.co/2Acuu086Kn#PradoshVrat2021 #BudhPradoshVrat #Mahadev
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2021
Do These Upay On Budh Pradosh Vrat 2021 To Plesed Mahadev
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Pradosh Vrat 2021 | 7 जुलैला आषाढ महिन्यातील बुध प्रदोष व्रत, जाणून घ्या दिवसानुसार व्रताचं महत्त्व
Pradosh Vrat | जुलै महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व