Shani Dev | शनिच्या त्रासातून वाचायचं असेल तर हे 5 उपाय नक्की करा

| Updated on: Oct 23, 2021 | 2:31 PM

शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित असतो. असे म्हटले जाते की शनिदेवाची कृपा एखाद्या भक्ताला भिकाऱ्यापासून राजा बनवू शकते, परंतु जर तो कोणावर रागावले तर व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ होतो. ती व्यक्ती सहजासहजी सावरु शकत नाही. जर तुम्ही देखील शनिच्या साढेसाती किंवा महादशेतून जात असाल तर शनिवारी हे उपाय करा.

Shani Dev | शनिच्या त्रासातून वाचायचं असेल तर हे 5 उपाय नक्की करा
Lord ShaniDev
Follow us on

मुंबई : शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित असतो. असे म्हटले जाते की शनिदेवाची कृपा एखाद्या भक्ताला भिकाऱ्यापासून राजा बनवू शकते, परंतु जर तो कोणावर रागावले तर व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ होतो. ती व्यक्ती सहजासहजी सावरु शकत नाही. जर तुम्ही देखील शनिच्या साढेसाती किंवा महादशेतून जात असाल तर शनिवारी हे उपाय करा.

हे उपाय कामी येतील –

1. जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर शनिवारी रात्री वाहत्या नदीच्या पाण्यात पाच लाल फुले आणि पाच दिवे सोडा, यामुळे धनाशी संबंधित समस्या दूर होतील.

2. मोहरीच्या तेलात भाजलेला पराठा काळ्या कुत्र्याला खायला द्या किंवा चपातीमध्ये मोहरीचे तेल लावून खायला द्या. याने शनिदेव प्रसन्न होतात.

3. असे म्हटले जाते की भगवान विष्णू पिंपळाच्या झाडात निवास करतात. अशा वेळी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा ठेवल्याने नारायणाच्या कृपेसोबतच शनिदेवाचीही कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात.

4. शनिवारी पाण्यात काळे तीळ टाकून ते शिवलिंगावर अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. यानंतर मंदिरात बसून शनि मंत्राचा जप करा आणि शनि चालीसा पठण करा. याचा खूप फायदा होईल.

5. शनिवारी एका भांड्यात मोहरीचे तेल काढा आणि त्यात तुमचा चेहरा पाहा आणि ते तेल कोणत्याही गरजूला दान करा. यामुळे शनिशी संबंधित त्रासही दूर होतो.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Diwali 2021 : दिवाळीला हे 10 सोपे उपाय करा, घरात सुख-समृद्धी येईल

Vastu tips | या धनत्रयोदशीला 3 दिशांची सफाई कराच, लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होईल