हिंदू धर्मात (Hindu Dharma) बुद्ध पौर्णिमेचे (Buddha Purnima 2022) विशेष महत्व आहे. वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. असं म्हणतात यादिवशी गौतम बुद्धांचा (Gautam Buddha) जन्म झाला होता. म्हणून हादिवस बुद्ध जयंती म्हणूनही साजरा केला जातो. यंदा बुद्ध पौर्णिमा आज म्हणजे मे महिन्यातील 16 तारखेला आली आहे. यादिवशी अनेक लोक उपवास ठेवतात. विधीवत पूजा करतात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी यावर्षी चंद्र ग्रहण (Lunar eclipse) ही लागत आहे. यादिवशी बुद्ध तसंच विष्णु आणि चंद्राची ही पुजा केली जाते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने पुण्य लाभतं. जाणून घेवूया आजच्या दिवशी कोणती कामं केली जातात. कोणती कामं केल्याने शुभ फळ प्राप्त होते.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी नदीत स्नान केले जाते. या स्नानाला विशेष महत्व आहे. असं केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते.
यादिवशी गरजू लोकांना दान करणं खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने गोदान करण्याइतके पुण्य प्राप्त होते.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी तीळ आणि तेल दान करावे. याने सर्व पाप नाहीसे होते.
यादिवशी तुम्ही तीर्थस्थळाला भेट देऊन स्नान करा. ओजळ भरून काळे तीळ पित्रांच्या नावाने अर्पित करा. असं केल्याने कलह आणि अशांती दूर होते.
यादिवशी चंद्रदेवाला अर्ध्य अर्पित करावे. असं करताना ओम सोमाय नम: मंत्राचा जप करा. यामंत्राचा जप 3,5 आणि 7 वेळा करा.
यावर्षी बुद्ध पौर्णिमा सोमवारी आली आहे. यादिवशी सफेद कपडे परिधान करा. सफेद सामग्री वापरून तयार केलेल्या व्यंजनांचे सेवन करा. असं करणं खूपच फायदेशीर ठरू शकतं.
बुद्ध पौर्णिमा सोमवारी आल्याने आजच्या दिवशी शंकराच्या पिंढींला पाण्याचा अभिषेक करा. विधीवत शंकराची पूजा करा.
यादिवशी तुम्ही साबुदाना खीर गरीबांना दान करू शकता. मंदिरात खीर दान करा. यादिवशी सातू, वस्त्र मीठाई, अन्न आणि जल पात्र दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाचे ध्यान करा. एका चांदीच्या प्लेट मध्ये तुपाचा दिवा लावा. कापूर आणि धूप लावा. त्यात मखाने आणि खारीक ठेवा. चंद्राला दुध अर्ध्य द्या. सफेद प्रसाद अर्पण करा. तुम्ही साबूदाना खीर अर्पण करू शकता. त्याने आर्थिक स्थिती सुधरू शकते. मखाने आणि खीर घरात सर्वांना वाटा.
(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)