Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे उपाय, सर्व इच्छा होतील पूर्ण

| Updated on: Mar 06, 2024 | 11:02 AM

Mahashivratri Upay: महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय करुन तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करु शकता. या सर्व इच्छा पूर्ण व्हावेत म्हणून महादेवाची पूजा करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने कोणते फायदे होतात जाणून घ्या.

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे उपाय, सर्व इच्छा होतील पूर्ण
Follow us on

Mahashivratri : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पूजा करतात. अशा स्थितीत जर तुम्हीही व्रत ठेवणार असाल तर या दिवसाची शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या.

आनंद आणि समृद्धीसाठी काय करावे

महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्ही शिवलिंगाची प्रतिष्ठापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या पहिल्या गाठीपेक्षा मोठा नसावा. शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करावी. हा उपाय तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि कल्याण वाढवेल.

आर्थिक संकटातून मुक्त होण्याचे मार्ग

महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा. यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा.

नोकरी-व्यवसायात प्रगतीचे मार्ग

महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिव मंदिरात 11 दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा.

महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना शिवपुराण, शिव सहस्त्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून किंवा पठन करू शकता. भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील.