प्रयागराज मध्ये आजपासून महाकुंभ मेळा सुरू झाला आहे. येथे पहिल्या शाही स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. लाखो नागा साधू हे येथे दाखल झाले आहे. पण तुम्ही नागा साधून बद्दल ऐकले असेल की ते सार्वजनिक ठिकाणी इतरवेळी दिसत नाही तर ते फक्त महा कुंभाच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी येतात आणि त्यानंतर पुन्हा निघून जातात. नागा साधू मध्ये पुरुषांसोबतच महिलांचा देखील समावेश असतो. जाणून घेऊ महिला नागा साधून बद्दल काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील.
नागा साधून मध्ये असे अनेक साधू आहेत जे वस्त्र धारण करतात आणि अनेक साधू हे दिगंबरा प्रमाणेच म्हणजेच वस्त्र विरहित असतात. पण जेव्हा स्त्रिया नागा साधू बनण्याची दीक्षा घेतात तेव्हा त्यांनाही नागा बनवले जाते. पण महिला नागा साधू पूर्ण कपडे परिधान करतात.
महिला नागा साधू न शिवलेले कपडे परिधान करतात. ज्याला गणती असे म्हटले जाते. नागा साधू होण्यापूर्वी स्त्रीला सहा ते बारा वर्षे ब्रह्मचर्य पाळावे लागते. जेव्हा स्त्रिया हे करतात तेव्हा त्यांच्या स्त्री गुरु त्यांना नागा साधू बनण्याची परवानगी देतात.
महिला नागा साधूला हे सिद्ध करावे लागते की तिने स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित केले आहे. आता त्या स्त्रीची संसारिक आस संपली आहे. महिला नागा साधूला स्वतःचे पिंडदान करावे लागते. मागचे आयुष्य मागेच सोडावे लागते. आखाड्याचे सर्वोच्च अधिकारी आचार्य महामंडलेश्वर हे महिला साधू बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करतात.
महिला नागा साधू पहाटे नदीत स्नान करतात. यानंतर महिला नागा साधू ध्यान करायला लागतात आणि त्यानंतर दिवसभर देवाचा जप करतात. सकाळी उठून महादेवाची पूजा करतात आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर दत्तात्रेयाची पूजा करतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)