श्री रामाला एकटे ठेवू नका, ‘रामायणातील’ सीतेने का केली मोदींकडे ही मागणी

| Updated on: Jan 03, 2024 | 11:02 AM

आमंत्रण मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना दीपिका म्हणते, 'मी या आमंत्रणासाठी अजिबात तयार नव्हते. मला त्याची अपेक्षाही नव्हती. जेव्हा मला  फोन आला तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आमच्यासाठी सीताजी आहात, संपूर्ण जग तुम्हाला याच नावाने ओळखते. तुमच्यासाठी तिथे असणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, कृपया आमचे आमंत्रण स्वीकारा...

श्री रामाला एकटे ठेवू नका, रामायणातील सीतेने का केली मोदींकडे ही मागणी
दिपीका चिखलीया
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : रामानंद सागर यांच्या रामायणातील सीतेचे पात्र अमर करणारी दीपिका चिखलिया (Deepika Chikhliya) अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. दीपिकाने तिच्या रामावरील प्रेम आणि या दिवसासाठी केलेल्या तयारीबद्दल खुलासा केला आहे. 22 जानेवारीबद्दलचा उत्साह व्यक्त करताना दीपिका म्हणते, ‘माझ्यासाठी हा खूप ऐतिहासिक दिवस आहे. येत्या पिढ्यांसाठी याला खूप महत्त्व असेल कारण श्री राम 500 वर्षांनंतर अयोध्येत परतणार आहेत. स्वतःच्या घरी परतणार आहेत. लोकांना माझ्याबद्दल माहिती आहे की मी राममयी आहे. माझीही रामजींवर नितांत श्रद्धा आहे. मी माझ्या आयुष्यातही सीतेची भूमिका साकारली आहे. माझ्यासाठी हा खरोखर खूप भावनिक क्षण असणार आहे. उलट हा काळ सर्व भारतीयांसाठी इतका अभिमानास्पद असेल की आपण त्याचे साक्षीदार आहोत हे येणाऱ्या पिढ्यांना सांगू.

तुम्हीही मला सीता मानता का?

आमंत्रण मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना दीपिका म्हणते, ‘मी या आमंत्रणासाठी अजिबात तयार नव्हते. मला त्याची अपेक्षाही नव्हती. जेव्हा मला  फोन आला तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आमच्यासाठी सीताजी आहात, संपूर्ण जग तुम्हाला याच नावाने ओळखते. तुमच्यासाठी तिथे असणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, कृपया आमचे आमंत्रण स्वीकारा. मात्र, त्यावेळी मला इतका आनंद झाला की माझ्या तोंडून बाहेर पडले की तूम्ही मलाही सीता मानता? ते म्हणू लागले, यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा

प्रभू रामाला सीतेसोबत ठेवा

मात्र, रामासह सीतेची मूर्ती नसल्याचं दीपिकाला दु:ख आहे. तिचं दु:ख व्यक्त करताना दीपिका म्हणते, ‘मला नेहमी वाटायचं की रामजीच्या शेजारी सीतेची मुर्ती असेल. तथापि, येथे तसे नाही, ज्याची मला खंत आहे. पंतप्रधानांना अयोध्येत रामासह सीतेची मुर्ती बसवण्याची विनंती करू इच्छिते असं म्हणाल्या.  राम आणि सीता एकत्र वास करू शकतील अशी एखादी जागा असावी. माझी तुम्हाला विनंती आहे की रामजींना एकटे ठेवू नका. त्यांचे बालपण अयोध्येत आहे असे मला वाटते. हे एक अतिशय सुंदर रूप आहे, प्रभावी आहे. माता सीतेलाही प्रभू रामासोबत ठेवले तर मलाच नाही तर सर्व महिलांना खूप आनंद होईल असे त्या म्हणाल्या.