हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) प्रचंड महत्त्व आहे. चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी अक्षय तृतीयेसारखा मुहूर्त लोकं चुकूनही चुकवत नाहीत. अक्षय तृतीया साजरी (Celebrate) करण्यामागे अनेक आख्यायिका आहेत, अनेक कथा (Stories) आहेत. आख्यायिका जरी प्रदेशांनुसार, लोकांनुसार वेगवेगळ्या असल्या तरी त्या सगळ्या आख्यायिकांमधून येणारे निष्कर्ष मात्र सारखेच आहेत. या आख्यायिका आपल्याला दान सर्वश्रेष्ठ आहे हे सांगतात, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर अक्षय तृतीयेसारखा दुसरा मुहूर्त नाही हे सांगतात. आख्यायिकांमधून अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचं कळून येतं आणि म्हणून हा दिवस हिंदू धर्मात सगळ्यात शुभ दिवस मानला जातो. काय आहेत या आख्यायिका, महाभारत,द्रौपदी,अन्नपूर्णा, श्रीकृष्ण-सुदामा, पवित्र गंगा नदी, सतयुग, त्रेतायुग या सगळ्याचा आणि अक्षय तृतीयेचा काय संबंध ? जाणून घेऊयात…
1. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता.
2. अक्षय तृतीयेच्याच दिवशी आकाशगंगेत निवास करणारी पवित्र गंगा नदी राजा भगीरथांच्या तपामुळे भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठवली होती.
3. देवी अन्नपूर्णेला देवी पार्वतीचे रूप मानले जाते, देवी अन्नपूर्णेचा जन्म अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी झाला होता. या दिवशी लोकं अन्नपूर्णा देवीची पूजा करून गरिबांना दान देतात.
4. दक्षिण भारतातील मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीने कुबेराच्या तपाने प्रसन्न होऊन त्यांना धनाचं देवता बनवलं होतं. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी यंत्र आणि भगवान कुबेराची देखील पूजा केली जाते.
5. महाभारतामध्ये देखील अक्षय तृतीयेचा उल्लेख सापडतो. महर्षी वेद व्यास यांनी याच शुभ दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. युधिष्ठिराला अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘अक्षय पात्र’ वरदान म्हणून मिळाले. वनवासात असताना या पात्रात द्रौपदी भोजन करायची, द्रौपदीचं भोजन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अक्षय पात्रातील अन्न संपत नसे.
6. एका कथेनुसार असे ही म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या याच शुभ दिवशी भगवान कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती.
7. भविष्यपुराण नुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगचा आरंभ झाला होता.
इतर बातम्या :